loader image
[ays_poll id=7]

फेसबुक आता मेटा नावाने ओळखले जाणार !

Oct 29, 2021


सोशल मिडीयावर आपली एक वेगळी छाप टाकणाऱ्या फेसबुकचे आता नाव बदलण्यात आले असून यापुढे फेसबुक “मेटा” या नावाने ओळखले जाणार आहे. फेसबुकच्या होल्डिंग कंपनीचे नाव बदलण्यात आले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी कंपनीच्या वार्षिक कार्यक्रमात यासंदर्भात घोषणा केली

आपल्यावर एक डिजिटल जग बनले आहे. ज्यात व्हर्चुअल रिअॅलिटी हेडसेट आणि एआयचा समावेश आहे. मेटावर्स मोबाइल इंटरनेटची जागा घेईल, असा आम्हाला विश्वास असल्याची माहिती देखील झुकरबर्ग यांनी दिली. नाव बदलण्याबरोबरच आता कंपनीमध्ये रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत. मैटावर्ससाठी आपल्याला हजारो लोकांची आवश्यकता आहे, अशी घोषणाही कंपनीने केली होती. सध्या कंपनी 10 हजार लोकांना रोजगार देण्याच्या तयारीत आहे

फेसबुकने मेटावर्स प्रोजेक्टमध्ये 2021 मध्ये 10 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली होती. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अर्निंग रिपोर्टमध्ये कंपनीने त्यांचा व्हर्चुअल रिऑलटी सेगमेंट एवढा मोठा झाला आहे, की आता तो आपल्या उत्पादनांना दोन श्रेणीमध्ये विभागू शकतो अशी घोषणा केली होती.

फेसबुकच्या या घोषणेनंतरही, मूळ अॅप आणि सव्हेिंस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे रीबॉडिंग आहे आणि कंपनी इतर प्रोडक्ट्स जसे, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम कंपनीच्या नव्या बॅनरखाली आणण्याची योजना आहे. आतापर्यंत, वॉट्सअॅप, इंस्टाग्रामला फेसबुकचे प्रॉड्क्ट्स म्हटले जात होते. मात्र, फेसबुक स्वतःच एक प्रोडक्ट आहे


अजून बातम्या वाचा..

शेतकरी आणि शेतमजूर यांनाही कृषीविषयक कौशल्य प्रशिक्षण देणार : कृषिमंत्री ना. भुसे

शेतकरी आणि शेतमजूर यांनाही कृषीविषयक कौशल्य प्रशिक्षण देणार : कृषिमंत्री ना. भुसे

आता कृषि आणि कृषीसंलग्न विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर शेतकरी आणि शेतमजूर यांनाही...

read more
महाराष्ट्राचा ‘बेस्ट स्टेट युटीलिटी’ पुरस्काराने सन्मान,  ‘गुणवत्ता सुधार’ वर्गवारीत महावितरणचा तृतीय क्रमांक

महाराष्ट्राचा ‘बेस्ट स्टेट युटीलिटी’ पुरस्काराने सन्मान, ‘गुणवत्ता सुधार’ वर्गवारीत महावितरणचा तृतीय क्रमांक

नवनवीन संकल्पनांचा प्रभावी वापर, महावितरणच्या ग्राहकांना उच्चदर्जाची सेवा मिळावी व त्याकरिता...

read more
निवडणुका असलेल्या पाच राज्यांमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावरून हटणार मोदींचे छायाचित्र !

निवडणुका असलेल्या पाच राज्यांमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावरून हटणार मोदींचे छायाचित्र !

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम गत आठवड्यात निवडणूक आयोगाने जाहीर करून शनिवार पासून...

read more
.