Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

फेसबुक आता मेटा नावाने ओळखले जाणार !

Oct 29, 2021

सोशल मिडीयावर आपली एक वेगळी छाप टाकणाऱ्या फेसबुकचे आता नाव बदलण्यात आले असून यापुढे फेसबुक “मेटा” या नावाने ओळखले जाणार आहे. फेसबुकच्या होल्डिंग कंपनीचे नाव बदलण्यात आले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी कंपनीच्या वार्षिक कार्यक्रमात यासंदर्भात घोषणा केली. 

आपल्यावर एक डिजिटल जग बनले आहे. ज्यात व्हर्चुअल रिअॅलिटी हेडसेट आणि एआयचा समावेश आहे. मेटावर्स मोबाइल इंटरनेटची जागा घेईल, असा आम्हाला विश्वास असल्याची माहिती देखील झुकरबर्ग यांनी दिली. नाव बदलण्याबरोबरच आता कंपनीमध्ये रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत. मैटावर्ससाठी आपल्याला हजारो लोकांची आवश्यकता आहे, अशी घोषणाही कंपनीने केली होती. सध्या कंपनी 10 हजार लोकांना रोजगार देण्याच्या तयारीत आहे. 

फेसबुकने मेटावर्स प्रोजेक्टमध्ये 2021 मध्ये 10 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली होती. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अर्निंग रिपोर्टमध्ये कंपनीने त्यांचा व्हर्चुअल रिऑलटी सेगमेंट एवढा मोठा झाला आहे, की आता तो आपल्या उत्पादनांना दोन श्रेणीमध्ये विभागू शकतो अशी घोषणा केली होती.

फेसबुकच्या या घोषणेनंतरही, मूळ अॅप आणि सव्हेिंस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री–बॉडिंग आहे आणि कंपनी इतर प्रोडक्ट्स जसे, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम कंपनीच्या नव्या बॅनरखाली आणण्याची योजना आहे. आतापर्यंत, वॉट्सअॅप, इंस्टाग्रामला फेसबुकचे प्रॉड्क्ट्स म्हटले जात होते. मात्र, फेसबुक स्वतःच एक प्रोडक्ट आहे. 

अजून बातम्या वाचा..

‘पेपरलेस’साठी मदत करा, वीजबिलात सवलत मिळवा गो ग्रीन योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

‘पेपरलेस’साठी मदत करा, वीजबिलात सवलत मिळवा गो ग्रीन योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

मुंबई/नाशिक, दि. १२ डिसेंबर २०२२ - मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी १ एप्रिलपासून ई ऑफीस प्रणाली...

read more
जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक : भाजप – शिंदे गटाची सत्ता,एकनाथ खडसेंच्या पत्नींचा पराभव

जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक : भाजप – शिंदे गटाची सत्ता,एकनाथ खडसेंच्या पत्नींचा पराभव

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप शिंदे गटाने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप- शिंदे गटाने 20...

read more
महामार्ग नव्हे, हा आहे आर्थिक समृद्धीचा महामार्ग – ही आहेत समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये

महामार्ग नव्हे, हा आहे आर्थिक समृद्धीचा महामार्ग – ही आहेत समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये

महाराष्ट्रासाठी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी...

read more
अविष्कार विद्यापीठ स्तरीय संशोधन स्पर्धा २२-२३ साठी मनमाड महाविद्यालयाच्या संशोधन प्रकल्पाची निवड

अविष्कार विद्यापीठ स्तरीय संशोधन स्पर्धा २२-२३ साठी मनमाड महाविद्यालयाच्या संशोधन प्रकल्पाची निवड

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढविण्या साठी संशोधन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]