चांदवड येथील एसएनजेबी संचलित आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे शनिवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता रानभाज्या प्रदर्शन आयोजित केले आहे, अशी माहिती प्रा डॉ मनोज पाटील व प्राचार्य डॉ. जैन यांनी दिली आहे. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थी व शिक्षक रानभाज्या विषयी माहिती देणार आहेत. यामध्ये रानभाज्यांचे औषधी व पोषण गुणधर्म याविषयी माहीती सांगणार आहेत. सदर प्रदर्शनासाठी विद्यार्थी विविध रानभाज्या रानावनातून, डोंगरदऱ्यातून गोळा करून त्यांची शास्त्रीय माहिती प्रदर्शनाच्या स्वरूपात मांडणार आहेत. रानभाज्यां बरोबर विद्यार्थी वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनही मांडणार आहेत. निसर्गातील विविध डोंगर दऱ्यांचे, झाडांचे, वनस्पतींचे, पानाफुलांचे, दगडांचे, खडकांचे, प्राण्यांचे विविध प्रकारचे छायाचित्रांचे प्रदर्शन होणार आहे.
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये बालकाच्या शिल्पाचे अनावरण
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये बालदिनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वारा समोर अभ्यास...












