महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे पॅन इंडिया अवेयर्नेस व आऊटरिच कॅम्पेयन नुसार तालुका विधी सेवा समिती व मनमाड वकील संघाचे संयुक्त विद्यमाने वंजारवाडी येथे कायदेशीर शिबीराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी तालुका विधी सेवा समितीचे पॅनेल वकील अॅड. रमेश अग्रवाल यांनी जेष्ठ नागरिक यांचे बाबत असलेले कायदे व त्यांचे हक्क तसेच लोकन्यायालय व मध्यस्थी केंद्र याबाबत माहिती दिली. ग्रामस्थांना कायदे विषयी माहिती बाबत पत्रके अॅड. पुजा मल्हारे, अॅड. यास्मिन शाह व कोर्ट कर्मचारी निकम भाऊसाहेब यांनी वितरित केले. कार्यक्रमा प्रसंगी वंजारवाडी गावातील सरपंच कांचन गायकवाड व सदस्य दत्तात्रय जाधव, संतोष पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
त्याचप्रमाणे मनमाड एस.टी. स्टॅंड येथे कायदे विषयी माहिती पत्रकाचे वितरण अॅड. पुजा मल्हारे व अॅड. यास्मिन शाह यांनी केले व उपस्थितीतांना अॅड.रमेश अग्रवाल यांनी कायदे विषयी जनजागृती होणे बाबत मार्गदर्शन केले . कायदेशीर शिबीराचे आयोजन मनमाड न्यायालयातील न्यायमूर्ती लोमटे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले.











