नाशिक येथील के.के.वाघ पॉलिटेक्नीक, इंजिनियरींग कॉलेज येथील प्रा.सुनिल पवार यांनी लिहिलेले इलेक्ट्रीकल व्हॅकल टेक्नॉलॉजी या पुस्तकाच्या पाच प्रति त्यांनी मनमाड येथील पंचशील सार्वजनिक वाचनालयास सप्रेम भेट दिल्या. त्याबद्दल वाचनालयाचे वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह सुधाकर भाले तसेच दयानंद घोडके, आनंद शिनगारे, के.संदीप, विश्वास भंडारे आदि उपस्थित होते.
जनजाती कल्याण आश्रम मनमाड शाखेचे वार्षिक स्नेह-मिलन संपन्न….
मनमाड : हिंदूहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून जनजाती कल्याण...










