Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी गॅस 265 रुपयांनी महागला !

Nov 1, 2021

देशात दिवसेंदिवस महागाई नवनवीन उच्चांक गाठत आहे. पेट्रोल-डिझेलने उच्चांक गाठल्यावर आता ऐन दिवाळीच्या पहिल्यात दिवशी केंद्र सरकारने देशातील सामान्य नागरिकांना महागाईचा झटका दिला आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून व्यावसायिक वापराच्या गॅसच्या दरात थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 265 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यावसायिक वापराचा 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1736.5 रुपयांवरुन 2000.5 रुपये इतकी झाली आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केलेली नाही. त्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

अजून बातम्या वाचा..

मृत्यमुखी पडलेल्या गिर्यारोहकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी सभेचे आयोजन

मृत्यमुखी पडलेल्या गिर्यारोहकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी सभेचे आयोजन

मनमाडची ओळख आलेल्या अंगठ्याच्या डोंगरावर रॅपलिंग करतांना झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या...

read more
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप

आमदार सुहास आण्णा कांदे संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून तसेच प्रहार अपंग क्रांती सेना संघटनेच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]