loader image
[ays_poll id=7]

कोव्हॅक्सिन घेतलेल्या भारतीयांना ऑस्ट्रेलियात ग्रीन सिग्नल!

Nov 1, 2021

काही दिवसांपूर्वी कोव्हॅक्सिन घेतलेल्या भारतीय नागरिकांना अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला आहे. दुसरीकडे कोव्हॅक्सिन घेतलेल्या भारतीय नागरिकांना ऑस्ट्रेलियाने प्रशासनाने देशात प्रवेश करण्यास मान्यता दिली आहे. ऑस्ट्रेलियाने भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लसीला मान्यता दिली आहे. ऑस्ट्रेलियाने मान्यताप्राप्त लसींमध्ये कोव्हॅक्सिनचा समावेश केला आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना आता ऑस्ट्रेलियात सहज प्रवेश मिळणार आहे. मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाने सिरम इन्स्टिट्यूटने निर्मिती केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीला मान्यता दिली होती. 

या निर्णयामुळे शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात येणारे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व कुशल मनुष्यबळाचा ऑस्ट्रेलियात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लसीकरण न झालेल्या व्यक्तींना क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल तसेच सर्व प्रवाशांचा कोविड-१९ रिपोर्ट निगेटिव्ह असला पाहिजे.

अजून बातम्या वाचा..

नवरीची पुस्तक तुला करून ग्रंथ आणि पुस्तके ग्रंथालयाला दिली भेट – वधू पित्याची अशीही संकल्पपूर्ती

नवरीची पुस्तक तुला करून ग्रंथ आणि पुस्तके ग्रंथालयाला दिली भेट – वधू पित्याची अशीही संकल्पपूर्ती

अंजनगावसुर्जी तालुक्यातील कारला येथे एक आगळा-वेगळा आणि रुढी-परंपरेला फाटा देणारा विवाह संपन्न...

read more
श्रीराम नवमी निमित्ताने गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणूक

श्रीराम नवमी निमित्ताने गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणूक

मनमाड शहराच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक परंपरेमध्ये मानाचे स्थान असणार्‍या ॐ मित्र मंडळ...

read more
नंदुरबार जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार जिल्हा क्रिकेट सोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या नंदुरबार वरिष्ठ महिला जिल्हा संघाच्या निवड...

read more
अभिमानास्पद – बघा व्हिडिओ – जागतिक युथ वेटलिफ्टींग स्पर्धेत मनमाड च्या आकांक्षा व्यवहारे ला कांस्य पदक

अभिमानास्पद – बघा व्हिडिओ – जागतिक युथ वेटलिफ्टींग स्पर्धेत मनमाड च्या आकांक्षा व्यवहारे ला कांस्य पदक

जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांक्षा व्यवहारे ला कांस्यपदक दुर्रेस अल्बेनिया येथे सुरु...

read more
.