Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

HAK हायस्कूल जवळील पूल वाहतुकीसाठी खुला !

Nov 1, 2021

मागील महिन्यात मनमाड शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या नदीला आलेल्या पुरामुळे  HAK हायस्कूल मागील रहदारीचा पूल हा वाहून गेला. पूल वाहून गेल्यामुळे सदर पुलावरून शहराच्या सिकंदर नगर, डॉ.आंबेडकर नगर, किर्ती नगर, माऊली नगर, तिरंगा नगर, गौसिया नगर, बुरकूलवाडी भागातील विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक यांना येण्या-जाण्यासाठी असुविधा निर्माण झाली होती. विद्यार्थी, पालक आणि ज्येष्ठ नागरिक यांचे मार्फत समाजसेवक बबलू शेख यांना वारंवार तक्रार येत होती. सदरील पुर येण्या-जाण्यासाठी त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शहर उपप्रमुख खालीद शेख  यांनी नगरसेवक विनय आहेर यांचेकडे केली तसेच नगरसेवक विनय आहेर यांनी गटनेते गणेश धात्रक यांच्याशी संपर्क साधत परिस्थितिची समक्ष जाऊन पाहणी केली व गणेश धात्रक यांनी त्वरित प्रशासनास सूचना करीत पुलाचे काम मुरूम टाकून सुरू केले. 

पूल पुन्हा रहदारीसाठी खुला करण्यात आल्यामुळे परिसरातील जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, पालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच गटनेते गणेश धात्रक, नगरसेवक विनय आहेर, शहरप्रमुख मयूर बोरसे, उपशहरप्रमुख खालिद शेख, रईस फारुकी, सुरज चावरिया, रवी खलसे, चौधरी साहेब यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

अजून बातम्या वाचा..

दिनांक 22 जानेवारी 2024 च्या श्रीराम मूर्ती स्थापना दिनी मांस विक्री बंद करावी,सर्व मंदिर स्वच्छता अभियान करून त्यावर विदयुत रोषणाई करावी -मनमाड शहर भाजपा मंडल ची मागणी

दिनांक 22 जानेवारी 2024 च्या श्रीराम मूर्ती स्थापना दिनी मांस विक्री बंद करावी,सर्व मंदिर स्वच्छता अभियान करून त्यावर विदयुत रोषणाई करावी -मनमाड शहर भाजपा मंडल ची मागणी

मनमाड शहर भाजपा मंडला तर्फे येत्या सोमवार दिनांक 22/01/2024 रोजी अयोध्या येथील पवित्र श्रीराम...

read more
केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा :- डॉ भारती पवार

केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा :- डॉ भारती पवार

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान पीएम जनमन योजनेअंतर्गत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]