loader image
[ays_poll id=7]

अखिल भारतीय मराठा महासंघाची बैठक संपन्न!

Nov 1, 2021


अखिल भारतीय मराठा महासंघाची महत्वपूर्ण बैठक महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम, उपाध्यक्ष उल्हास देशमुख, एल.एन.पवार, भास्कर झाल्टे, कार्याध्यक्ष कपिल निफाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव येथे पार पडली.

नांदगाव येथील शासकिय विश्रामगृहात पार पडलेल्या महासंघाच्या बैठकित मराठा समाज तालुक्यात बहुसंख्य असल्याने समाजाच्या अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा होवून पुढिल ठराव संमत करण्यात आले. नांदगाव शहर व मनमाड शहरात मराठा समाजासाठी समाज मंदिर व्हावे, तालुक्यातील मराठा समाजातील  सुशिक्षीत बेरोजगारांना कै. अण्णासाहेब पाटिल आर्थिक विकास महामंडळाकडून व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य मिळण्याकामी कार्यशाळेचे आयोजन करणे, सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मदत व्हावी या दृष्टीने कार्यशाळेचे आयोजन करणे, शासन स्तरावरून मराठा जात दाखले पुर्ववत सुरू करण्यात यावे,  नांदगाव व मनमाड शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा उभारावा आदि ठराव यावेळी बैठकित सहमत करण्यात आले. दरम्यान, नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांना विविध  मागणीचे निवेदन देण्यात आले.

विधानसभा निवडणुकीतील माझ्या विजयात मराठा समाजाचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे मी मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे आमदार कांदे यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाच्या ज्या 47 तरूणांनी आत्मबलिदान केले. त्यांच्या वारसांना सरकारी नोकरित सामावून घ्यावे, अशी मागणी कोणीही न सांगता स्वतःहून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. तर बलिदान देणार्या 47 तरूणांच्या कुटूंबाची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना आर्थिक मदत देणार असल्याचे आमदार कांदे यांनी सांगितले.

यावेळी बैठकित समाजाचे ज्येष्ठ हेमंत गवळे, तालुकाध्यक्ष भिमराव लोखंडे, कार्याध्यक्ष सुरेश शेळके, उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, विशाल वडघुले, रविंद्र नाठे, प्रकाश जगताप, विनोद डंबरे, मनमाड शहरप्रमुख विष्णु चव्हाण, तालुका चिटणीस भरत सुर्यवंशी, संघटक गणेश काकळीज, महेंद्र लोखंडे, सचिव आकाश झाल्टे, सल्लागार अॅड. शंकर वाळेकर, रावसाहेब सरोदे, दिलीप जाधव, रतन निकम, महेंद्र जाधव आदि उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.