Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भावा बहीणीच्या नात्यातील प्रेम व्यक्त करणारा सण “भाऊबीज”!

Nov 6, 2021

दिवाळीचे दिवस सर्वत्र आनंद उत्साह चैतन्य भरभराट घेउन येणारे असतात. नैराश्याचे मळभ दुर सारून सर्वत्र चैतन्याचा सडा शिंपणारा हा सण प्रत्येकाला हवाहवासा वाटतो आणि म्हणुनच या सणाची आपण वर्षभर आतुरतेने वाट देखील पाहात असतो. या सणाची शाळांना मोठी सुट्टी असल्याने बच्चेकंपनीची तर मजाच असते त्यामुळे त्यांना या सणाची आगळीवेगळी ओढ असते. शाळांना सुट्ट्या, फटाक्यांची आतीषबाजी, फराळावर मारता येणारा ताव त्यामुळे १५ दिवस नुसता धुडगुस असतो.

बरेचजण या दिवसांमध्ये बाहेरगावी जाण्याचे देखील प्लॅन्स् आखतात…. दिवाळीच्या या पाच दिवसांमधे प्रत्येक नात्याचा विचार करण्यात आला आहे… आता बघाना बाप लेकीच्या नात्याचा पाडवा… पतीपत्नीच्या नात्याचा पाडवा… आणि त्यानंतर येतो…भावा बहीणीच्या नात्याला साजरा करणारा दिवाळीचा पाचवा दिवस भाऊबीज !

कार्तिक शुध्द व्दितीयेला येणाऱ्या या सणाला यमव्दितीया असे देखील म्हणतात. हिंदी भाषीक या सणाला भाईदुज असे म्हणतात. दिपावलीचा हा पाचवा आणि अखेरचा दिवस असतो. या दिवशी भाऊ बहिणीकडे जातो आणि बहिण त्याला ओवाळते अशी पध्दत आहे.
धर्मग्रंथात असे सांगीतले आहे की या दिवशी बायकोच्या हातचे जेऊ नये. भावाने बहिणीकडे किंवा बहिणीने भावाकडे जाऊन त्याला ओवाळावे स्वतःच्या हाताने तयार केलेले पदार्थ त्याला खाऊ घालावेत.

पौराणिक कथेच्या दाखल्याप्रमाणे आजच्या दिवशी यमराज त्याची बहिण यमुनेच्या घरी गेला आणि तीला वस्त्र अलकांराच्या रूपात अनेक भेटवस्तु दिल्या, तिच्या घरी भोजन केले त्यामुळेच या दिवसाला यमव्दितीया असे देखील म्हणतात. या दिवशी यमुना स्नान करावे असे केल्याने वर्षभर यमाची भिती राहात नसल्याचे बोलले जाते. आजच्या दिवशी यमराजा आपली बहिण यमीकडे जेवण्याकरता जात असल्याने आजच्या दिवस नरकातील जिवांची नरकाच्या यातनांमधुन सुटका होते अशी आख्यायिका सांगीतली आहे.

यमराजाचा मृत्यु झाल्यानंतर त्याची बहिण यमी हिला अत्यंत दुःख झाले आणि भावनाविवश होउन ती सतत रडु लागली कितीतरी वेळ रडल्यानंतर देखील तीचा दुःख आवेग कमी होई नां आणि तिचे अश्रु थांबेचना अखेर परमेश्वराने दिवस मावळला असे चित्र तिच्या समोर उभे करण्याकरता रात्र निर्माण केली आणि त्यामुळे तिच्या दुःखाची तिव्रता कमी झाली. तेव्हांपासुन भाऊबीजेची परंपरा सुरू झाली.

पाडव्याला पतीचे औक्षवण झाल्यानंतर स्त्रियांना माहेराची ओढ लागते… ही ओढ माहेरी जाउन भावाला भेटण्याची त्याला ओवाळण्याची असते. या दिवशी बहिण भावाला औक्षवण करण्यापुर्वी आधी चंद्राला ओवाळते… या दिवशी चंद्र देखील लवकर दिसत नाही त्याची छोटीशी कोर दिसते त्यावेळी त्याला ओवाळले जाते आणि त्यानंतर भावाला औक्षवण करतात. सख्खा भाऊ नसल्यास नात्यातील भावाला अन्यथा धर्माच्या भावाला तरी ओवाळावे असे सांगीतले आहे.

ओवाळण्याचे खुप महत्व आहे. भाऊबीजेच्या दिवशी स्त्रियांमधले देवीतत्व जागृत झालेले असते त्यामुळे या काळात भावाने बहिणीच्या सान्निध्यात वेळ घालवल्यास त्याला व्यवहारीक आणि आध्यात्मिक दृष्टया लाभ होतो. बहीणीने भावाच्या मस्तकावर लावलेला टिळा म्हणजे बहिणीचे निस्वार्थी प्रेम असते आणि भावाला औक्षवण केल्याने तो यमराजाच्या पाशातुन मुक्त होतो, त्याला मृत्युचे भय राहात नाही तो चिरंजीव होतो असे बहिणीने भावाला ओवाळण्याचे महत्व ग्रंथांमध्ये विशद केले आहे. अपमृत्यु येऊ नये या करीता आजच्या दिवशी ब्राम्हणास दिपदान करण्याची देखील पध्दत आहे. सकाळच्या वेळेस बहिणीने भावाला तेल उटणे लावुन अंघोळ घालावी त्याच्या आवडीचा पदार्थ करून त्याला जेवू घालावे त्याचं औक्षवण करावं आणि भावाने बहिणीला भेटवस्तु देऊन बहिणीचा यथोचीत सत्कार करावा.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात डॉ. स्मिता प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

मनमाड महाविद्यालयात डॉ. स्मिता प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज दिनांक १४...

read more
मनमाड महाविद्यालयातील विद्यार्थ्याची एम.पी.एस.सी. मार्फत मंत्रालयात महसूल सहाय्यक पदी निवड

मनमाड महाविद्यालयातील विद्यार्थ्याची एम.पी.एस.सी. मार्फत मंत्रालयात महसूल सहाय्यक पदी निवड

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड मधील माजी विद्यार्थी...

read more
खिदमत-ए – खल्क फाउंडेशन, मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप.

खिदमत-ए – खल्क फाउंडेशन, मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना...

read more
मनमाडच्या शिरपेचात मानाचा तुरा – तृप्ती पाराशर भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी, मुकुंद आहेर ची भारतीय संघात निवड

मनमाडच्या शिरपेचात मानाचा तुरा – तृप्ती पाराशर भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी, मुकुंद आहेर ची भारतीय संघात निवड

मनमाडच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा कॉमनवेल्थ वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
नॅशनल रेल्वे मजदुर युनियन ची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे कर्षण मशिन कारखाना विस्तारीकरणाची मागणी

नॅशनल रेल्वे मजदुर युनियन ची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे कर्षण मशिन कारखाना विस्तारीकरणाची मागणी

  रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे दि 30-06-2023 शनिवारी नाशिक रोड स्टेशनला स्लीपिंग...

read more
राजसत्तेचा वापर जनतेच्या शिक्षणासाठी करणारे शाहू महाराज खरे राजर्षी – अलका नागरे – साळवे

राजसत्तेचा वापर जनतेच्या शिक्षणासाठी करणारे शाहू महाराज खरे राजर्षी – अलका नागरे – साळवे

मनमाड :- ''आपल्या लेकरांना शिक्षण न देणाऱ्या पालकांना दंड देणारे राजर्षि शाहू महाराज, बहुजन-...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]