loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : ६ नोव्हेंबर २०२१ !

Nov 6, 2021


मेष : घरच्यांना वेळ द्याल. वेळेचे आणि आर्थिक बाबींचे नियोजन करणे हिताचे.

वृषभ : यश मिळाले तरी नम्रतेने त्यात इतरांना सामावून घ्या. ‘जिभेची गोडी आनंद आणी’ हे लक्षात ठेवा. 

मिथुन : दिवस प्रगतीचा आहे. नवे कौशल्य शिका, आत्मनिर्भर बना. यश डोक्यात जाऊ देऊ नका. 

कर्क : व्यावहारिक निर्णय घ्या. नवी जबाबदारी घेणे टाळा.

सिंह : प्रामाणिक प्रयत्न करा, यश मिळेल. सातत्यावर भर द्या.

कन्या : विचारपूर्वक करार करा. व्यवहार जपून करा.

तूळ : प्रयत्नांमध्ये सातत्य असल्यास यश मिळेल. कृती महत्त्वाची आहे. 

वृश्चिक : बोलताना संयम राखा. गोड बोलून काम पूर्ण करुन घ्याल. 

धनु : नव्या वाटा नव्या दिशा शोधा. प्रयत्न करा, यश मिळवा.

मकर : कुणाला कमी लेखू नका. गोड बोला, वाद टाळा.

कुंभ : नम्रता महत्त्वाची. यश मिळाले तरी नम्रतेने त्यात इतरांना सामावून घ्या.

मीन : चिंता सोडा. आला दिवस मजेत जगा. संवादातून मार्ग काढा.


अजून बातम्या वाचा..

.