Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

युवा फाउंडेशनच्या वतीने सलग 7 व्या वर्षी दिवाळीनिमित एक हात मदतीचा !

Nov 6, 2021

दिवाळी हा सण सगळेच मोठ्या उत्साहाने साजरा करतात, परंतु आजही भारतात असे अनेक परिवार आहेत कि ज्या परिवारांना दिवाळी काय असते, त्याचा आनंद कसा साजरा करतात याची कल्पना देखील नसते. अपना ज्या समाजात वावरतो, ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाचे आपण काही देण लागतो याच हेतूने गेल्या 7 वर्षापासून नांदगाव शहरातील युवा फाउंडेशनच्या माध्यमातून सुमित सोनवणे व त्यांचे सहकारी ज्या घरात दिवाळी नाही अशा वाडी-वस्त्यांवर जावून दिवाळी साजरी करतात.

चिवडा, कपडे, स्वेटर, साडी, पणत्या या सामाजिक उपक्रमात शहरातील द्वारका नगर परिसरात वाटप करण्यात आले. शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींचे मोठे सहकार्य लाभले असल्याचे युवा फाउंडेशन सामाजिक संस्थेचे सुमित सोनवणे यांनी सांगितले तसेच गोरगरीब गरजू जनते पर्यंत वस्तु पोहच करण्याचे काम संस्थेचे सुमित सोनवणे सह सुमित गायकवाड, उबेद शेख, प्रसाद वडनेरे, ऋषि जाधव, निखिल रांगोळे आदि करतात

युवा फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या ६ वर्षांपासुन हा सामाजिक उपक्रम राबविला जातो. या उपक्रमाबद्दल परिसरातून युवा फाऊंडेशनवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

अजून बातम्या वाचा..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]