ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला बिग बॅश लीगमध्ये भारतीय महिला खेळाडूंनी धुमाकूळ घातला आहे. 6 नोव्हेंबरला, हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्स या दोघींनी तुफानी फलंदाजी करत मेलबर्न रेनेगेड्स संघाला 4 विकेट्सच्या बदल्यात 207 धावांपर्यंत मजल मारुन दिली. हरमनप्रीत कौरने 32 चेंडूंत 4 चौकार आणि 6 षटकारांसह 65 धावा कुटल्या. तिने केवळ 10 चेंडूत 65 पैकी 52 धावा ठोकल्या. त्याचवेळी जेमिमाने 31 चेंडूत 10 चौकारांसह 52 धावांची खेळी केली. यानंतर हरमनप्रीत कौरने गोलंदाजीतही कमाल केली आणि 19 धावांत एक विकेट घेतली. अशाप्रकारे विरोधी ब्रिस्बेन हीटचा संघ 192 धावांवर गडगडला आणि मेलबर्न रेनेगेड्स संघाने ब्रिस्बेन हीटचा 15 धावांनी पराभव केला. हरमनप्रीत कौरला तिच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
भारताच्या दौऱ्यावर चार संघ येणार , सामन्यांचे वेळापत्रक जाहीर
भारताच्या दौऱ्यावर न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हे क्रिकेट संघ येणार आहेत....





