नाशिक जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढवा यासाठी मनमाड नगर पालिका प्रशासनातर्फे प्रभाग निहाय लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन नगर पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. दि.११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान या लसिकरणाचे आयोजन करण्यात आले आहे.













