संस्कारक्षम आनंददायी शिक्षणाची सुरुवात…हे बीद्र वाक्य असलेली संस्कार खेळवाडी गेली १५ वर्षापासून मनमाड मध्ये कार्यरत आहे, बालकांवर कृतीतून, हसत खेळत संस्कार, शिक्षण हे शाळेचे वैशिष्ट्य आहे, 14 नोव्हेंबर बालदिन अशाच अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला.
शिवाजी नगर नं २, वाघदर्डी रोड येथील आदिवासी भागातील बालकांसोबत संस्कार खेळवाडीतील बालकांनी बालदिन साजरा केला, त्यांच्या सोबत प्रार्थना झाली, त्यांची घरे बघितली, त्यांच्या सोबत विविध खेळ खेळण्यात आले, खाऊ वाटप, खेळणी वाटप करण्यात आले, आदिवासी बालकानी देखील या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळेतील विद्यार्थ्यांना देखील एक नवीन अनुभव व माहिती मिळाल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली. उपक्रमासाठी सौ.वैशाली भोसले, सौ रूपाली गागरे, उमेश कुलकर्णी यांनी प्रयत्न केले.
खुशाली गांगुर्डे,करुणा गाढे,दिया व्यवहारे,वैष्णवी ईप्पर यांची आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड
आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या दक्षिण व पच्छिम विभागीय आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी कला...










