Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ऑल इंडिया एस.सी.एस.टी. रेल्वे एम्प्लॉ.असो. तर्फे होणार महिला कर्मचाऱ्यांचा गौरव….

Nov 17, 2021

मनमाड : मनमाड रेल्वे वर्कशॉप स्थापना ही १९०६ साली झाली. सुरुवातीला या वर्कशॉप मध्ये फक्त पुरुष कर्मचारी हे काम करीत होते.

काळानुसार बदल होत गेले आणि कार्यालयीन कामकाजामध्ये महिलाची नियुक्ती करण्यास सुरुवात झाली.तर अनुकंपा तत्त्वावर होणा-या महिला नियुक्ती ही कार्यालयात व गुलजॉईड या विभागात होते असं.
पण काळानुसार बद्दल होत गेला आणि सावित्रीच्या लेकी या पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागल्या यामध्ये वर्कशॉप मागे नाही या ठिकाणी ही आता पुरूषांच्या बरोबरीने महिला आता काम करू लागल्या.

दोन वर्षांपूर्वी महिला कर्मचारी मालती पावरा ही ई.ओ.टी.क्रनेड्राव्हरवर काम करीत आहे.ई.ओ.टी.क्रनेड्राव्हरवर काम करणारी मालती पावरा ही पहिलीच महिला कर्मचारी आहे.
तर आता वेल्डिंग विभागात कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी पुजा सुपेकर व सुवर्णा डोलणार या वेल्डिंग विभागातील अवघड व ज्या ठिकाणी फक्त कुशल कर्मचारी काम करू शकतात अशा ठिकाणी म्हणजे S.A.W.वेल्डींग मशीन चालवणे.हे काम आता पुजा सुपेकर, सुवर्णा डोलणार या महिला कर्मचारी करीत आहे.

आशा निडर महिला कर्मचारी पुजा सुपेकर, सुवर्णा डोलणार त्यांच्या कामाचे कौतुक म्हणून व इतर महिला कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ च्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.अशी माहिती झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय भाऊ गेडाम, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड यांनी दिली.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

नांदगाव - मारुती जगधने येथील योग प्रशिक्षक बाळू मोकळ यांनी चक्क बर्फाच्या थंड लादीवर ५१ योगासने व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]