Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

चांदवड तालुक्यात दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू !

Nov 18, 2021

चांदवड तालुक्यातील पाटे येथे दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची अतिशय ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ओम तळेकर आणि प्रणव तळेकर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच अख्ख्या गावात शोककळा पसरली. आपली दोन्ही मुळे शेततळ्यात बुडाल्याचे समजताच शेतकरी संजय तळेकर आणि त्यांच्या पत्नीने एकच आक्रोश सुरू केला. आई-वडिलांचा आकांत पाहून गावकरीही हेलावून गेले.

पाटे येथील शेतकरी संजय किसन तळेकर यांना दोन मुले आहेत. त्यात ओम हा 13 वर्षांचा असून, दुसरा मुलगा प्रणव. तो 11 वर्षांचा आहे. सध्या कोरोनामुळे अनेक ठिकाणच्या शाळा बंद आहेत. हे दोघे भाऊ घरातील शेळ्या शेतात चारायला घेऊन गेले होते. शेळ्या नाल्याजवळ गेल्या. तिथून जवळच पुढे शेततळे होते. त्यांनी शेततळ्याकडे पळ काढला. शेळ्यांना वळवायचे म्हणून लहान प्रणव शेततळ्यावर गेला. मात्र, त्याचा पाय घसरून तो शेततळ्यात पडला. आपला लहान भाऊ शेततळ्यात पडल्याचे दिसताच ओमने मागचा पुढचा विचार न करता शेतळ्यात उडी मारली. मात्र, दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

शेतात चरायला सोडलेल्या शेळ्या दोन तासांनी शेतकरी संजय तळेकर यांच्या घरी पोहचल्या. मात्र, मुले आले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांची चौकशी सुरू केली. शेवटी शेताकडे धाव घेतली. तेव्हा शेततळ्यावर आपल्या मुलांच्या दोन चपला त्यांना दिसल्या. त्यांनी गावातील नागरिकांना बोलावून घेतले. शेततळ्यात गळ टाकला. तेव्हा दोघा भावांचा मृतदेह मिळाला. या घटनेची माहिती चांदवड पोलीस ठाण्याला देण्यात आली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेबद्दल पाटेगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]