Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

टाकाऊ प्लास्टिकपासून बुटाची निर्मिती : युवा उद्योजकाला आनंद महिंद्रा यांनी दर्शविली मदतीची तयारी !

Nov 19, 2021

आनंद महिंद्रा यांना एका 23 वर्षीय स्टार्टअप व्यावसायिकाची आयडिया आवडली. त्याला मदत करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. सामाजिक काम करणाऱ्यांच्या अथवा क्रिएटिव्हिटी दाखवणाऱ्यांच्या मदतीला महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा नेहमीच तयार असतात.याची अनेक उदाहरणं तुम्ही पाहिली असतील. त्यांच्या याच कार्यामुळे आनंद महिंद्रा नेहमीच चर्चेत असतात.

आताही आनंद महिंद्रा आपल्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहेत. आनंद महिंद्रा यांना एका 23 वर्षीय स्टार्टअप व्यावसायिकाची आयडिया आवडली. त्याला मदत करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. प्लास्टिक बॉटल आणि टाकावू बॅगच्या मदतीनं या मुलाची कंपनी बूटाची निर्मिती करते. या 23 वर्षीय मुलाची आयडिया मंहिंद्रा यांना आवडली. ट्वीट करत महिंद्रा यांनी मन की बात केली आहे. या 23 वर्षीय मुलाचं नाव आशय भावे असं आहे. टाकाऊ प्लॅस्टिकवर रिसायकल करुन बूट तयार करण्याची आयडिया आशय भावे याला शिक्षण घेत असताना सूचली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आशयनं लगेच स्टार्टअप सुरु केलं. आशय भावेच्या स्टार्टअपचं नाव ‘थैली‘ असं आहे. आनंद महिंद्रा आशयच्या या कंपनीची मदत करण्यास तयार आहेत. त्यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

अजून बातम्या वाचा..

ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ : विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मानले आभार!

थंडी, उन, वारा, पाऊस या अस्मानी संकटात मानधनावर काम करणाऱ्या राज्यातील ग्राम विद्युत...

read more

आस्थापनांना दंड आकारणी करण्याची तरतूद तत्काळ रद्द करावी : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी !

कोरोनाच्या नव्या संकटाला रोखण्याच्या निमित्ताने राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन नियमावलीमध्ये...

read more

जनावरांची गणना होते, आम्हालाही मोजा : ओबीसी आरक्षणावरून भुजबळांचा केंद्रावर हल्लाबोल !

आपल्या खास शैलीतील शेरोशायरी साठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांनी आज देखील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]