loader image
[ays_poll id=7]

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला !

Nov 19, 2021


संपूर्ण जिल्हयाला प्रतिक्षा लागून असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जिल्हा रिषद पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी गट, गण चना करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक शाखेला प्राप्त झाले आहे. सन २०११ची लोकसंख्या गृहीत धरून ३० नोव्हेंबरपर्यंत ही गट गण रचना करण्याची कार्यवाही पूर्ण करावी अन राज्य निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. ही कार्यवाही झाल्यानंतर गट आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे

याबाबत, राज्य निवडणूक आयोगाकडून गुरुवारी (दि.१८) रात्री उशीरा पत्र प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची मुदत फेब्रुवारी २०२२ मध्ये संपुष्टात येत आहे. साधारण ही मुदत संपण्यापुर्वी सहा महिने जिल्हा परिषदेची गट पंचायत समितीची गण रचना सुरू होते. जि.. अध्यक्षांचे रक्षण देखील पडले जाते. गत पाच पंचवार्षिक निवडणुका दरम्यान ऑक्टोबर महिन्यातच गट रचना होऊन गटाचे आरक्षण पडले होते. मात्र, निवडणुका तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सताना गट, गण रचना आरक्षणाबाबत हालचाली नसल्याने निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, राज्य निवडणुक आयोगाने जिल्हा निवडणूक शाखेला पत्र देत गट गण रचना करण्याचे आदेश बजाविले आहे. गट गण रचना करतांना सन २०११ची लोकसंख्या विचारत घेण्यात यावी. गट रचना करण्याची पध्दत आयोगाने निश्चित करून दिली आहे. यात साधारण गृहीत धरावयाची लोकसंख्या, कच्चा आराखडा तयार करण्यासाठी समिती, गटांची मांडणी, गटांची संख्या निश्चिती, सरासरी लोकसंख्या, गट, गण रचनेची दिशा यांचा विचार करावा असे सुचविले आहे. गट, गण करतांना तो फोडू नये, अपवादात्मक परिस्थितीत फोडायचा झाल्यास त्यांची प्रणाली देण्यात आली आहे. तयार करण्यात आलेला गट, गण रचनेचा च्चा आराखडा गोपनीय ठेवण्यात यावा, आरक्षण जाहीर होईपर्यंत कोणासही माहिती देऊ नये अशा स्पष्ट सूचना आयोगाने दिल्या आहेत


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.