loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २० नोव्हेंबर २०२१ !

Nov 20, 2021


मेष : आज वेगळाच उत्साह जाणवेल. पण जास्त काम आणि दगदगीमुळे अतिरिक्त तणाव आणि थकवा येऊ शकतो. 

वृषभ : आर्थिक स्थितीत सुधारणा जाणवेल. पण घरगुती गोष्टींवर आवश्यक पैसा खर्च करावा लागेल. घरातील काही बदलांमुळे मनस्ताप होऊ शकतो. 

मिथुन : मिथुन राशीचे लोक खूप दिवसांनी एखाद्या मित्राच्या भेटीनंतर चिंताग्रस्त होऊ शकतात. त्यात घरात तणावपूर्ण वातावरण राहील. शांत डोक्यानं काम कराल.

कर्क : अनियोजित सहलीमुळे खूप मनस्ताप होऊ शकतो. जोडीदाराला पुरेसा वेळ न दिल्याने तो नाराज होण्याची शक्यता आहे.

सिंह : मनात काही विचार सुरू असतीत तर त्यांनी ते ताबडतोब जोडीदाराच्या कानावर घालावेत. नकारात्मक विचार हे विषापेक्षा वाईट असतात, हे काही लोकांना लक्षात ठेवण्याची गरज आहे.

कन्या : योग आणि ध्यानाच्या मदतीनं त्यांच्या समस्या काही काळासाठी विसरण्यास सक्षम असतील. वादामुळे घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे.

तूळ : कायदेशीर लढाई जिंकू शकतात. परंतु त्यांनी दुखावलेल्या लोकांची मने जिंकण्यासाठी त्यांना खूप काही करावे लागेल. चूक मान्य करायला शिका.

वृश्चिक : वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही बाबतीत कुटुंबातील वरिष्ठ सदस्याने दिलेला सल्ला काळजीपूर्वक ऐकला पाहिजे. शांत डोक्यानं प्रश्न सोडवावे लागतील.

धनु : आयुष्यात सर्वात जास्त आवडत असलेल्या लोकांची आठवण येईल. त्यांनी अचानक एखाद्या जुन्या मित्राला भेटण्यासाठी सहलीची योजना आखली तर आश्चर्यचकित होऊ नका.

मकर : एखाद्याला खात्री असल्याशिवाय कोणतेही वचन देऊ नये. त्यांच्याकडे समस्यांबद्दल दुःखी राहण्याचा किंवा हसण्याचा आणि चिंता विसरून जाण्याचा पर्याय आहे.

कुंभ : जोडीदाराची अप्रिय बाजू कळू शकते. काळजी करण्याऐवजी त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की पृथ्वीवर कोणीही दोषरहित नाही.

मीन : आपल्या प्रियजनांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याच्या पर्यायाचा विचार करावा. कामाचा व्यााप जाणवेल. फक्त विश्रांतीची गरज आहे.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.