मेष :- रागावर नियंत्रण ठेवा. विचार करून बोला. भागीदारीत सबुरीने वागावे.
वृषभ :- जास्त विचार करत बसू नका. चारचौघात कौतुक होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
मिथुन :- एकाच गोष्टीवर ठाम राहावे. वैचारिक गुंतागुंत वाढेल. क्षुल्लक कारणावरून चिडू नका.
कर्क :- कामाची दगदग वाढेल. सर्वांना आपलेसे करून घ्याल. क्षुल्लक मतभेदात अडकू नका.
सिंह :- तुमच्याबाबत गैरसमज पसरू शकतो. कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. अधिकाराचा वापर करा.
कन्या :- अतितिखट पदार्थ खाणे टाळावे. अपशब्द टाळण्याचा प्रयत्न करावा. बोलताना विचार करून बोलावे.
तूळ :- रागावर नियंत्रण ठेवावे. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.
वृश्चिक :- राजकारणी धोरण महागात पडू शकते. एकाच गोष्टीवर अडून राहू नका. कर्ज प्रकरणे वेळेवर हाताळा.
धनू :- सौंदर्यवादी दृष्टिकोन बाळगाल. आवडीचे पदार्थ चाखाल. कामे मनाजोगी पार पडतील. झोपेची तक्रार जाणवेल.
मकर :- तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे. पैज जिंकता येईल. कामातील बदल जाणून घ्या.
कुंभ :- जुनी कोर्टाची कामे निघू शकतात. उद्दीष्ट साध्य करण्यासाठी तयार रहा. आवडती वस्तू खरेदी कराल.
मीन :- शारीरिक कष्ट अधिक संभवतात. किरकोळ दुखापत होण्याची शक्यता. प्रवासाचा योग संभवतो.



