नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलन मुख्य मंडप उभारणी दिमाखदार सोहळ्याने संमेलनाची सुरवात झाली आहे. नाशिकचा प्रथम नागरिक म्हणून साहित्य संमेलन चांगले कसे पार पडेल याकडे लक्ष दिले जाईल. नाशिककर तसेच महानगरपालिका संमेलनात अग्रेसर राहतील असा विश्वास महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केला. कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या मैदानात संमेलन मुख्य मंडप उभारणी सोहळा महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
नाशिकमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाचे नाव मोठ्या प्रतिक्षेनंतर संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले. कादंबरीकार विश्वास पाटील शुक्रवारी संमेलनाचे उद्घाटन करणार असून संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून गीतकार जावेद अख्तर असतील. रविवारी (ता.५) संमेलनाचा समारोप शरद पवार यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर उपस्थित असतील.
याप्रसंगी, स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडे, संमेलनाचे मुख्य समन्वयक समीर भुजबळ आदींसह संमेलन पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचालन मुकुंद कुलकर्णी यांनी केले.













