loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २२ नोव्हेंबर २०२१

Nov 22, 2021


मेष :- भावंडांची मदत होईल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात.

वृषभ :- नातेवाईकांच्या गाठी पडतील. स्वत:विषयी फाजील मत बनवू नका. गैरसमजाला मनात थारा देऊ नका.

मिथुन :- दिवस आवडीप्रमाणे व्यतीत कराल. पत्नीचा प्रेमळ सहवास लाभेल. पोटाच्या तक्रारी जाणवतील. उगाचच चिडचिड करू नये.

कर्क :- नातेवाईकांचा रूसवा दूर करावा लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वारसाहक्काची कामे पुढे सरकतील.

सिंह :- नवीन कामात हात घालाल. आवडीची वस्तू मिळेल. जवळची व्यक्ति भेटेल.

कन्या :- बोलतांना भान राखावे. आरोग्यात थोडीफार सुधारणा संभवते. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

तूळ :- काही अचानक येणार्‍या जबाबदार्‍या पेलाव्या लागतील. धनलाभाची शक्यता.

वृश्चिक :- काही वेळेस माघार घेणे इष्ट ठरेल. अडथळ्यातून मार्ग काढावा.

धनू :- फक्त स्वत: पुरता विचार करू नका. मित्रांशी वाद होऊ शकतात. अधिक कष्ट घेण्याची तयारी ठेवावी.

मकर :- मनातील योजना आमलात आणाल. कामात अधिक प्रयत्न करावे लागतील.

कुंभ :- कौटुंबिक बाबीत अधिक लक्ष घालावे. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे. प्रवासात काळजी घ्यावी.

मीन :- उद्दीष्ट साध्य करण्यात यशस्वी व्हाल. एकावेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.