loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २३ नोव्हेंबर २०२१ !

Nov 23, 2021


मेष :- राग अनावर होऊ शकतो. मन अस्थिर राहील. अनावश्यक खर्च टाळावा.

वृषभ :- केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. संयम सोडून वागू नका. जुन्या मित्रांची गाठ पडेल.

मिथुन :- कामाच्या भारामुळे थकवा जाणवेल. कष्टाचे फळ थोड्या अवधीने मिळेल. अनावश्यक खर्च वाढू शकतो. आनंदी वृत्ती ठेवावी.

कर्क :- नवीन कामे अंगावर पडतील. उत्साह कमी पडू देऊ नका.

सिंह :- शांततेचे धोरण ठेवावे. अधिकाराचा योग्य वेळी वापर करावा. शरीराला किरकोळ जखम संभवते.

कन्या :- स्वभावात उधळेपणा येईल. वस्तूंची गरज लक्षात घेऊन खरेदी करावी. कोणाचा राग मनात धरून ठेऊ नका.

तूळ :- जवळच्या व्यक्तीशी मनमोकळे बोलावे. फार त्रास करून घेऊ नका. समतोल साधण्याचा प्रयत्न करावा.

वृश्चिक :- स्त्रीवर्गापासून सावध राहावे. पायाचे त्रास जाणवतील. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

धनू :- कामात जोडीदाराची मदत घ्याल. मुलांच्या मनात आदर निर्माण होईल.

मकर :- हातातील कामात चिकाटी ठेवा. आळस झटकून काम करावे लागेल. वडीलधार्‍यांची सेवा कराल.

कुंभ :- नातेवाईकांना नाराज करू नका. तुमच्यातील हुशारी दिसून येईल. प्रवास त्रासदायक ठरू शकतात.

मीन :- खर्चाला आवर घाला. मनात उगाचच भलत्या शंका आणू नका. हातातील कामाला प्राधान्य द्यावे.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.