Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

….तर संबंधितांवर गुन्हे दाखल करा – न्यायालयाचे आदेश ।

Nov 23, 2021

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असलेले एस.टी.कर्मचारी आंदोलन दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत चालले आहे.

कामावर रूजू होऊ इच्छिणाऱ्या एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्यात येत असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर, कर्मचार्यांना अडवणूक करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मुभा महामंडळ आणि पोलिसांना असेल, असा इशारा उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. संघटनांच्या सदस्यांनी हिंसक मार्गाचा अवलंब करू नये. या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदविण्याची एसटी महामंडळाला, तर तक्रारीची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करण्याची पोलिसांना मुभा असेल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयात आलेल्या संघटनेव्यतिरिक्त अन्य कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीपुढे आपले म्हणणे मांडावे. तसेच समितीनेही या कर्मचारी संघटनांचे, सरकार आणि एसटी महामंडळाचे म्हणणे ऐकून घेऊन त्याबाबतच्या निष्कर्षांचा प्राथमिक अहवाल २० डिसेंबपर्यंत सादर करावा, असे आदेश न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने दिले.

विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाहतुकीअभावी शाळांमध्ये जाण्यास त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कर्मचारी संघटनेने संप मागे न घेण्याच्या आपल्या भूमिकेबद्दल फेरविचार करावा, असेही न्यायालयाने सूचवले.

अजून बातम्या वाचा..

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]