Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

गोष्ट “एक दिवसाच्या पंतप्रधानाची!”

Nov 26, 2021

महाराष्ट्रात पहाटेच्या शपथविधीची चर्चा आजही होते. अवघ्या दोन दिवसांत कोसळलेलं ते सरकार आजवरचं सर्वात कमी कालावधीचं महाराष्ट्र सरकार ठरलं होतं. असाच काहीसा प्रकार स्वीडनमध्ये घडला आहे.

तिथे मॅगडलेना अँडरसन या स्वीडनच्या पंतप्रधानपदी बसणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या खऱ्या. पण पहिल्याच दिवशी मित्रपक्षाने पाठिंबा काढून घेतल्याने त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. संसदेत पहिल्या दिवशी त्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाला संमती मिळू शकली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांच्या अर्थसंकल्पावर संसदेत चर्चा झाली. 

“आघाडीतल्या कोणत्याही एका पक्षाने पाठिंबा काढून घेतला की राजीनामा देण्याची आपल्याकडे घटनात्मक परंपरा आहे. मला अशा सरकारचं नेतृत्व करायचं नाहीय, ज्याच्या वैधतेवरच प्रश्न उपस्थित केले जातील,” असं त्या म्हणाल्या. 

स्वीडनमध्ये महिलांना मतदानाचा हक्क दिल्याच्या 100 वर्षांनंतर सोशल डेमोक्रट पक्षाच्या अँडरसन या पंतप्रधानपदी निवडून येणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. आता आपण पुन्हा स्वबळावर पंतप्रधानपदी निवडून येण्याचा प्रयत्न करू, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

अजून बातम्या वाचा..

मै भी डिजिटल 4.0 मोहिमेअंतर्गत पथविक्रेत्यांना कर्ज वितरीत : शहरात कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारणार – आमदार कांदे

मै भी डिजिटल 4.0 मोहिमेअंतर्गत पथविक्रेत्यांना कर्ज वितरीत : शहरात कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारणार – आमदार कांदे

दि.09/02/2023 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया, मनमाड मुख्य शाखा या कार्यालयात आमदार श्री. सुहास (आण्णा)...

read more
बघा व्हिडिओ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक  येथे माता रमाई जयंती निमित्त भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे माता रमाई जयंती निमित्त भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मनमाड येथे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 125 वी जयंती मोठ्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]