Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ऑल इंडिया एस.सी.एस. टी. रेल्वे.एम्प्लॉ.असो.तर्फे ‘संविधान गौरव दिन’ साजरा !

Nov 27, 2021

ऑल इंडिया एस.सी./एस.टी. रेल्वे एम्प्लाइज असोसिएशन, मनमाडतर्फे संविधान दिनानिमित्त ‘संविधान गौरव दिन’ साजरा करण्यात आला.

संविधान दिनानिमित्त सकाळी मनमाड रेल्वे वर्कशॉप मध्ये टाइम बूथ समोर संविधानाच्या प्रास्तविकाचे वाचन करण्यात आले. झोनल सचिव सतिश केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक कारखाना प्रबंधक पापाचंद साहेब, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम, कारखाना शाखा कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाडचे सचिव संदीप धिवर, कारखाना शाखा उपाध्यक्ष सागर गरूड, कारखाना शाखा अतिरिक्त सचिव रमेश पगारे आदी उपस्थित होते.
यावेळी संतोष शिलावट यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे सामुहिक वाचन केले. तसेच वेल्डिंग विभागातील महिला कर्मचारी पुजा सुपेकर सुवर्णा डोलणार व G.M.पुरस्कार मिळालेले कर्मचारी मनिष साळवे यांच्या सत्कार सहाय्यक कारखाना प्रबंधक पापाचंद साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
कामगारांमध्ये भारतीय संविधान जनजागृती व्हावी यासाठी ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे कारखाना मधील टाईम बुथ जवळ भारतीय संविधान च्या उद्दशिकाचे बॅनर लावण्यात आले आहे, त्याचे अनावरण यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शरद झोंबाड यांनी केले तर आभारप्रदर्शन सचिन इंगळे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा उपाध्यक्ष सुभाष जगताप, कारखाना शाखा वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, बहुजन युवक संघ अध्यक्ष रोहित भोसले, बहुजन युवक संघ सचिव नवनाथ जगताप, कारखाना शाखा सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, कारखाना शाखा कार्यालय सचिव संदीप पगारे, वरिष्ठ कार्यकर्ते रविंद्र पगारे, संजय केदारे, फकिरा सोनवणे, किरण आहीरे, कल्याण धिवर, प्रशांत मोरे, पंढरीनाथ पठारे, किरण वाघ, प्रदीप अहिरे, राहुल शिंदे,प्रेमदिप खडताळे, विनोद झोडपे, राजू इसमपल्ली, वरूण म्हसदे, अभ्युदय बागुल, अनिल अहिरे, राजेंद्र सोनवणे, राजेश जगताप, निखिल सोनवणे, संतोष सांवत, धम्माल पखाले आदीने केले. यावेळी कामगार बंधू आणि भागिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड जळगाव स्थानकादरम्यान १४,१५ ऑगस्ट रोजी मेगब्लॉक – अनेक गाड्या रद्द तर काहींच्या मार्गात बदल

मनमाड जळगाव स्थानकादरम्यान १४,१५ ऑगस्ट रोजी मेगब्लॉक – अनेक गाड्या रद्द तर काहींच्या मार्गात बदल

मनमाड-जळगाव स्थानकादरम्यान मेगाब्लॉकमुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून या काळात प्रवाशांना...

read more
नवक्रांतीची ज्योत तेवत ठेवा ,क्रांती दिनी निर्धार नवक्रांती युवक सघांचा ५ वा वर्धापन दिन उत्सवात साजरा

नवक्रांतीची ज्योत तेवत ठेवा ,क्रांती दिनी निर्धार नवक्रांती युवक सघांचा ५ वा वर्धापन दिन उत्सवात साजरा

नांदगाव प्रतिनिधी देशावर,राज्यावर बोलण्यापेक्षा गावावर बोला आणि क्रांतीदिन साजरा करतांना ज्या...

read more
बघा व्हिडिओ – रायपूर गावातील शिव रस्ता केला ग्रामस्थांनी बंद – अतिक्रमण हटवून मोजणी करण्याची गावकऱ्यांची मागणी

बघा व्हिडिओ – रायपूर गावातील शिव रस्ता केला ग्रामस्थांनी बंद – अतिक्रमण हटवून मोजणी करण्याची गावकऱ्यांची मागणी

चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शीव रस्ता शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने बालवाडी तसेच चिमुकल्यांना...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]