गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या प्राथमिक शाळा सुरु करण्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आदेश दिले आहेत. दि.१ डिसेंबर पासून शाळा सुरु होत आहेत. गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असून शाळा भोवती गावात व घानकचरा मोठ्या प्रमाणावर साचला असून मनमाड नगरपालिकेच्या शाळा देखील याला अपवाद नाहीत. भविष्यात शाळा सुरु झाल्यावर विद्यार्थ्यांना मलेरिया, डेंग्यू सारखे आजार होऊ नयेत म्हणून नगरपालिकेने त्वरित सर्व शाळांची साफसफाई करून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुख सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या आशयाचे निवेदन शिवसेना शहर उपप्रमुख खालिद शेख यांनी मनमाडचे मुख्याधिकारी महोदयांना दिले आहे. यावेळी शिवसेना गटनेते गणेश धात्रक देखील उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे
नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...










