loader image
[ays_poll id=7]

सावधान : कोरोनाच्या नवीन व्हेरीएंटने “या” घातला धुमाकूळ!

Nov 28, 2021

कोरोनाच्या सावटातून आपण आता कुठे सावरतोय तोच एका नव्या विषाणूचं सावट जगाला भेडसावतं आहे. आफ्रिकेत सापडलेल्या या नव्या विषाणूचं नामकरण जागतिक आरोग्य संघटनेनं ‘ओमिक्रॉन’ ((B.1.1.529)असं केलंय. जगात अनेक देशांनी उपाययोजना सुरु असतानाच भारताची चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.

दक्षिण आफ्रिकेवरून भारतात बंगळूरू विमानतळावर दाखल झालेल्या दोन जणांमध्ये कोरोनाचे नवा स्ट्रेन आहे की नाही याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. या सर्वांना ट्रॅक करून त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. बंगळूरुच्या केम्पेगौडा विमानतळावर शनिवारी (27 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेतून विमान आले. या विमानात 594 प्रवासी होते. त्यापैकी दोन दक्षिण आफ्रिकेचे नागरिक कोरोनाबाधित आढळले आहेत.

बंगळूरूचे आयुक्त के. श्रीनिवास म्हणाले, दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन नागरिक कोरोनाबाधित आढळले आहेत. परंतु ओमेक्रॉन स्ट्रेनबाबत अहवाल आल्यानंतरच माहिती मिळेल. विमानात 594 प्रवासी होते त्यापैकी 94 प्रवासी हे दक्षिण आफ्रिकेतून आलेले प्रवासी आहेत. सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून या सर्व रुग्णांना ‘आयसोलेशन’मध्ये ठेवण्यात आलंय. तसंच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आलंय. अजूनही काही प्रवाशांची माहिती घेणं सुरू आहे.

अत्यंत वेगानं फैलावत जाणाच्या गुणधर्मामुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन अतिशय धोकादायक असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे देशात याबद्दल अधिक सतर्कता बाळगण्यात येते आहे. सध्या तयार करण्यात येत असलेल्या लशी करोनाचा नव्या स्ट्रेनवर कितीपत फायदेशीर ठरतील, हे सांगणंदेखील तज्ज्ञांना कठीण जातंय, त्यामुळे या धोक्याला दूर ठेवणं हाच सर्वोत्तम उपाय असल्याचं सध्यातरी दिसतंय.

24 नोव्हेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेत सर्वात आधी कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटची नोंद जागतिक आरोग्य संघटनेनं केली. त्यानंतर बोत्सवाना, बेल्जियम, हाँगकाँग आणि इस्रायलमध्ये देखील हा नवीन व्हेरिएंट आढळला. नव्या व्हेरिएंटचा धोका ओळखून बर्‍याच देशांनी आता दक्षिण आफ्रिकेतील प्रवासावर बंदी किंवा निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिका, नामिबिया, झिम्बाब्वे, बोत्सवाना, लेसोथो आणि इस्वाटिनी येथील प्रवासी यूके किंवा आयरिश नागरिक किंवा यूकेचे रहिवासी असल्याशिवाय यूकेमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत.

अजून बातम्या वाचा..

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
.