शुक्रवार (दि.26) रोजी खाकीबाग येथे अश्पाक तांबोळी यांच्या घरात गॅस सिलेंडरने पेट घेऊन आग लागली. त्यात त्यांच्या घराचे प्रचंड नुकसान होऊन घरातील सर्व सामान जळून खाक झाले. या घटनेची दखल घेऊन आमदार सुहास कांदे यांनी आदेश देऊन शिवसेनेचे शिष्टमंडळ त्वरित भेटीसाठी पाठवले व त्यांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात शिवसेनेचे जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद, तालुका उपप्रमुख सुभाष माळवतकर, दिनेश केकान, शहर संघटक कृष्णा जगताप, राहुल आहिरे आदि उपस्थित होते.
मनमाड शहरात मोहम्मद रफी यांना गितातुन आदरांजली
मनमाड शहरात मोहम्मद रफी साहेबांचे चाहते असलेल्या कलावंतांनी आपल्या सुरेली आवाजात गित गायनातून...










