Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आस्थापनांना दंड आकारणी करण्याची तरतूद तत्काळ रद्द करावी : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी !

Nov 29, 2021

कोरोनाच्या नव्या संकटाला रोखण्याच्या निमित्ताने राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन नियमावलीमध्ये लसीकरण पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींना ५०० रुपये दंड व दुकानांमध्ये लसीकरण पूर्ण न केलेला ग्राहक आढळल्यास १० हजार रुपये दंडाची तरतूद रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केली आहे. 

व्यापारी आपल्या आस्थापनांमध्ये लसीकरण पूर्ण केलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देतील. यासाठीचे आवश्यक ते प्रबोधनही करतील. परंतु; एखाद्या ग्राहकाच्या चुकीची शिक्षा दुकानदाराला देणे हे कुठल्याही पद्धतीने तर्कसंगत नाही. त्यामुळे सरकारने दंडाची ही तरतूद त्या त्या व्यक्तीला लागू करावी. व्यापारी आस्थापनांना दंड आकारणी करण्याची तरतूद तत्काळ रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

गेल्या दोन वर्षांत कोरोना संबंधीच्या विविध निबंधांमुळे मुळातच व्यापारीवर्ग अडचणीत आलेला आहे. आता कुठे व्यापार सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे. दोन वर्षांचे नुकसान भरून कसे काढायचे, या विवंचनेत व्यापारी आहेत. सरकारी कार्यालयात एखादा नागरिक विनालसीकरण आढळला तर त्याचा दंड कोणाकडून आकारला जाणार आहे? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यापारीवर्गाकडून व्यक्त होत आहेत. सरकारने या विषयात विलंब न करता हा निर्णय तत्काळ रद्द करावा; अन्यथा व्यापा–यांना पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशाराही ललित गांधी यांनी यावेळी दिला. 

अजून बातम्या वाचा..

कृषीमंत्री दादा भुसे यांचे खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांना पत्र

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये शेतकर्यांचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. वाढत्या खर्चामुळे...

read more

१२८० गावे कृषिपंपांच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त,३१ मार्चपर्यंत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

कृषिपंपांच्या वर्षानुवर्ष थकीत वीजबिलांच्या रकमेत सुमारे ६६ टक्के सवलतीचा लाभ घेत ३ लाख ७५ हजार...

read more

कोरोना-ओमीक्रोन संसर्गाच्या नियमांचे पालन शाळा-महाविद्यालय सरसकट नियमित सुरू करण्याची अध्यापकभारतीची मागणी

कोरोना व ओमीक्रोन संसर्गाच्या नियमांचे पालन करत सरकारी,निमसरकारी उद्योग-व्यवसाय व कार्यालयीन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]