यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी सर्व बाजूनी होरपळून निघाला आहे, त्यातच महावितरण कडून सक्तीची वसुली सुरु असल्यामुळे शेतकरी अजूनच हलाकीच्या परीस्तीतीतून जात आहे, तरी महावितरण कडून होणारी सक्तीची वसुली त्वरित थांबविण्यात येवून शेतकर्यांना शासनाने दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन सरपंच शेतकरी महासंघातर्फे देविदास उगले यांनी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना दिले आहे.
शेतकरी बांधवाना शेती पंपासाठी ३ फेज लाईटची गरज असते, महावितरण शेती पंपासाठी रात्री उशिरा लाईट उपलब्ध करून देते आणि ती सुद्धा ये-जा करत असते. दिवसा सिंगल फेज सुद्धा लाईट नियमित उपलब्ध नसते, या आणि यासारख्या अनेक समस्यांना शेतकरी दररोज सामोरे जात आहे, तरी शासनाने शेतकरी हितासाठी योग्य निर्णय घ्यावा, असे देखील निवेदनात म्हटले आहे.













