loader image
[ays_poll id=7]

ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ : विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मानले आभार!

Nov 29, 2021

थंडी, उन, वारा, पाऊस या अस्मानी संकटात मानधनावर काम करणाऱ्या राज्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणला दिले आहे.
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या कामाचे स्वरूप पाहून म.रा.वी.मं. सुत्रधारी कंपनीच्या कार्यालयामध्ये नुकतीच बैठक घेतली. या बैठकीस महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे व संचालक (प्रकल्प/मासं) भालचंद्र खंडाईत उपस्थित होते. तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये महावितरणकडून काही सेवा पुरविण्यासाठी फ्रेन्चायझी तत्त्वावर ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना प्रतिमाह ३ हजार रुपये मानधन देण्यात येत होते. कामाच्या तुलनेत मानधन कमी असल्यामुळे ग्राम विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात २ हजार रुपयाची वाढ करण्यात आली असून याचा लाभ राज्यातील ५०० हून अधिक ग्राम विद्युत व्यवस्थापकांना मिळणार आहे. शुक्रवार (दि.२६) पासून ही वाढ लागू झाली आहे.
ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात केलेल्या वाढीबाबत ग्राम विद्युत व्यवस्थापक अण्णासाहेब चौभे, महेश तुपे व इतर ग्रामविद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांचे आभार व्यक्त केले आहे.

अजून बातम्या वाचा..

नवीन कृषी वीज धोरणाला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद : १७.४० लाख शेतकऱ्यांनी नोंदविला सहभाग !

नवीन कृषी वीज धोरणाला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद : १७.४० लाख शेतकऱ्यांनी नोंदविला सहभाग !

नवीन कृषी वीज धोरण २०२० ला राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी केलेल्या आवाहनाला उत्तम...

read more
महावितरणच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे बिले भरली तरच कंपनी टिकेल -उर्जामंत्री ना. डॉ. नितिन राउत यांचे प्रतिपादन

महावितरणच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे बिले भरली तरच कंपनी टिकेल -उर्जामंत्री ना. डॉ. नितिन राउत यांचे प्रतिपादन

महावितरण कंपनी एक ग्राहक आहे.  महावितरण कंपनी वीज निर्मिती कंपनीसह खाजगी वीज निर्मिती कडून वीज...

read more
निफाड, नांदगाव, लासलगाव, मनमाड येथील रेल्वे थांबे पूर्ववत सुरू करणेकामी केंद्रीय रेल्वेमंत्री सकारात्मक – ना.डॉ.भारती पवार

निफाड, नांदगाव, लासलगाव, मनमाड येथील रेल्वे थांबे पूर्ववत सुरू करणेकामी केंद्रीय रेल्वेमंत्री सकारात्मक – ना.डॉ.भारती पवार

नाशिक जिल्ह्यातील निफाड, नांदगाव, लासलगाव, मनमाड सह परिसरातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची...

read more
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन भाषण डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार डॉ नितीन राऊत यांच्या पुढाकाराला यश

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन भाषण डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार डॉ नितीन राऊत यांच्या पुढाकाराला यश

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन, भाषण व विचार लवकरच मराठीत डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार...

read more
.