loader image
[ays_poll id=7]

ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ : विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मानले आभार!

Nov 29, 2021


थंडी, उन, वारा, पाऊस या अस्मानी संकटात मानधनावर काम करणाऱ्या राज्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणला दिले आहे.
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या कामाचे स्वरूप पाहून म.रा.वी.मं. सुत्रधारी कंपनीच्या कार्यालयामध्ये नुकतीच बैठक घेतली. या बैठकीस महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे व संचालक (प्रकल्प/मासं) भालचंद्र खंडाईत उपस्थित होते. तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये महावितरणकडून काही सेवा पुरविण्यासाठी फ्रेन्चायझी तत्त्वावर ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना प्रतिमाह ३ हजार रुपये मानधन देण्यात येत होते. कामाच्या तुलनेत मानधन कमी असल्यामुळे ग्राम विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात २ हजार रुपयाची वाढ करण्यात आली असून याचा लाभ राज्यातील ५०० हून अधिक ग्राम विद्युत व्यवस्थापकांना मिळणार आहे. शुक्रवार (दि.२६) पासून ही वाढ लागू झाली आहे.
ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात केलेल्या वाढीबाबत ग्राम विद्युत व्यवस्थापक अण्णासाहेब चौभे, महेश तुपे व इतर ग्रामविद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांचे आभार व्यक्त केले आहे.


अजून बातम्या वाचा..

सकाळी उद्धव ठाकरेंसोबत बोलले आणि दुपारी निर्णय जाहीर – शिवसेनेचे अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील

सकाळी उद्धव ठाकरेंसोबत बोलले आणि दुपारी निर्णय जाहीर – शिवसेनेचे अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील

शिवसेनेचे वरिष्ठ नेते अर्जुन खोतकर यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले आहे....

read more
श्री नेमिनाथ जैन तंत्रनिकेतनातील प्रथमेश गांगुर्डे याचा “पॉवरलिफ्टिंग १०५ किलो वजनी गटात” प्रथम क्रमांक

श्री नेमिनाथ जैन तंत्रनिकेतनातील प्रथमेश गांगुर्डे याचा “पॉवरलिफ्टिंग १०५ किलो वजनी गटात” प्रथम क्रमांक

चांदवड, येथील श्री नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री एच. एच. जे. बी. पॉलिटेक्निकमध्ये अध्ययन...

read more
डॉ प्रणित सोनावणे यांचे ” बायो इंटॅक्ट ” तंत्रज्ञानामुळे सांधे प्रत्यारोपणाचे एका महिन्यात अर्धे शतक

डॉ प्रणित सोनावणे यांचे ” बायो इंटॅक्ट ” तंत्रज्ञानामुळे सांधे प्रत्यारोपणाचे एका महिन्यात अर्धे शतक

नाशिक : प्रतिनिधी  अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक येथील सुप्रसिद्ध सांध्येप्रत्यारोपण...

read more

(बघा व्हिडिओ)राज्यपाल कोश्यारी यांचे पुन्हा वादग्रस्त विधान : विरोधकांची कारवाईची मागणी

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलेआहे. त्यांनी...

read more
महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भेटून सदिच्छा व्यक्त केल्या

महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भेटून सदिच्छा व्यक्त केल्या

द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या १५ व्या महामहिम राष्ट्रपती म्हणून आज शपथ घेतली आहे.पहिल्या महिला...

read more
.