loader image
[ays_poll id=7]

ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ : विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मानले आभार!

Nov 29, 2021


थंडी, उन, वारा, पाऊस या अस्मानी संकटात मानधनावर काम करणाऱ्या राज्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणला दिले आहे.
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या कामाचे स्वरूप पाहून म.रा.वी.मं. सुत्रधारी कंपनीच्या कार्यालयामध्ये नुकतीच बैठक घेतली. या बैठकीस महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे व संचालक (प्रकल्प/मासं) भालचंद्र खंडाईत उपस्थित होते. तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये महावितरणकडून काही सेवा पुरविण्यासाठी फ्रेन्चायझी तत्त्वावर ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना प्रतिमाह ३ हजार रुपये मानधन देण्यात येत होते. कामाच्या तुलनेत मानधन कमी असल्यामुळे ग्राम विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात २ हजार रुपयाची वाढ करण्यात आली असून याचा लाभ राज्यातील ५०० हून अधिक ग्राम विद्युत व्यवस्थापकांना मिळणार आहे. शुक्रवार (दि.२६) पासून ही वाढ लागू झाली आहे.
ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात केलेल्या वाढीबाबत ग्राम विद्युत व्यवस्थापक अण्णासाहेब चौभे, महेश तुपे व इतर ग्रामविद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांचे आभार व्यक्त केले आहे.


अजून बातम्या वाचा..

आजादी का अमृत महोत्सवातंर्गतमहावितरणतर्फे ‘उज्ज्वल भारत-उज्वल भविष्य’ महोत्सवाचे आयोजन

आजादी का अमृत महोत्सवातंर्गत
महावितरणतर्फे ‘उज्ज्वल भारत-उज्वल भविष्य’ महोत्सवाचे आयोजन

नाशिक : केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालय व राज्य ऊर्जा विभागाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव...

read more
समाज प्रबोधन/ कीर्तन कार यांना कै.ह.भ.प. रामदास महाराज यांच्या नावाने दिला जाणार पुरस्कार : महाराष्ट्र सरकारची घोषणा

समाज प्रबोधन/ कीर्तन कार यांना कै.ह.भ.प. रामदास महाराज यांच्या नावाने दिला जाणार पुरस्कार : महाराष्ट्र सरकारची घोषणा

संत कैकाडी महाराजांचा वारसा पुढे चालविणारे पंढरपूरच्या कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती थोर समाज...

read more
” ऑपरेशन नन्हे फरिश्ते ” ; म.रे. सुरक्षारक्षक बलाच्या जवानांनी ६ महिन्यात ७४५ बालकांना त्यांच्या परिवाराच्या स्वाधीन केले

” ऑपरेशन नन्हे फरिश्ते ” ; म.रे. सुरक्षारक्षक बलाच्या जवानांनी ६ महिन्यात ७४५ बालकांना त्यांच्या परिवाराच्या स्वाधीन केले

अनेक वेळा घरच्यांनी रागवले म्हणून रागाच्या भरात लहान बालके हे रेल्वे प्रवास करत असतात अशाच लहान...

read more
केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर “हर घर संविधान” हा उपक्रम राबवावा : संविधान साक्षरता-संवर्धन अभियानाची राष्ट्रपती,प्रधानमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी

केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर “हर घर संविधान” हा उपक्रम राबवावा : संविधान साक्षरता-संवर्धन अभियानाची राष्ट्रपती,प्रधानमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी

भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तरी देशभर साजरी होत असताना ज्या भारतीय संविधानामुळे भारत हे संघराज्य...

read more

(बघा व्हीडीओ)भरधाव रुग्णवाहिकेने घेतला ४ जणांचा बळी : घटना कॅमेऱ्यात कैद

कर्नाटकमधल्या एका टोल नाक्यावर या अँब्युलन्सचा असा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू...

read more
.