Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

महापरीनिर्वाण दिनी सर्वांना अभिवादन करता येणार आहे – महापौर किशोरी पेडणेकर !

Dec 2, 2021

येत्या सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आहे. त्यामुळे चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी मुंबईत येतात. पण, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजन करण्यात येणार आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

गेल्या वर्षी देखील कोरोनाचं संकट होतं. त्यामुळे मोजक्या लोकांना चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्याची संधी दिली होती. यंदा सर्वांना बाबासाहेबांना अभिवादन करता येणार आहे. त्यासाठी चैत्यभूमीच्या बाहेर रांगा लागतील. लाखो अनुयायी मुंबईमध्ये येतील. त्यांचं उन, पावसापासून संरक्षण करण्यासाठी निवारे तयार करण्यात आले आहेत. तसेच त्यांना खायला सुद्धा देण्यात येणार आहे. मात्र, ओमिक्रॉनचा धोका पाहता सर्वांना काळजी घेणे गरजेचे आहे. मुंबईत असणाऱ्या लोकांनी बाबासाहेबांना ऑनलाइन अभिवादन करावं. कारण, त्यांना कधीही चैत्यभूमीवर जाऊन दर्शन घेता येतं. बाहेरून आलेल्या लोकांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महापौर, उपमहापौरांनी अभिवादन केल्यानंतर सर्वांना अभिवादन करण्याची संधी दिली जाईल, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयात लाचलुचपत विभागाची कारवाई, लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयात लाचलुचपत विभागाची कारवाई, लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात आज दुपारी लाच लुचपत विभाग धुळे च्या अधिकाऱ्यांनी यशस्वी सापळा...

read more
भीमोत्सव २०२२ या प्रबोधनात्मक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचा सहा  दिवसांचा उत्सव साजरा होणार

भीमोत्सव २०२२ या प्रबोधनात्मक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचा सहा  दिवसांचा उत्सव साजरा होणार

शहरातील फुले शाहू आंबेडकर विचारधारेला मानणाऱ्या व्यक्ती संघटना संस्थांनी एकत्र येत भीमोत्सव २०२२...

read more
गुरुकुल पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेज नांदगाव येथे आज नोकरी मेळाव्याचे आयोजन

गुरुकुल पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेज नांदगाव येथे आज नोकरी मेळाव्याचे आयोजन

नांदगांव येथील गुरुकुल पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या माध्यमातून नांदगाव तालुका व...

read more
मागणीनुसार वीजपुरवठ्याचे विक्रम मोडीत ग्राहकांनो, विजेचा वापर काटकसरीने करा ;महावितरणचे  आवाहन

मागणीनुसार वीजपुरवठ्याचे विक्रम मोडीत ग्राहकांनो, विजेचा वापर काटकसरीने करा ;महावितरणचे आवाहन

गेल्या पंधरवड्यापासून मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित कार्यक्षेत्रात महावितरणकडून मागणीप्रमाणे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]