सेंट्रल रेल्वे इंजीनियरिंग कारखान्यास मुख्य इंजीनियर विकाकुमार जैन यांनी भेट दिली असता सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या सेफ्टी, जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सखोल अशी चर्चा केली. त्यामध्ये वर्कशॉप मध्ये गेल्या तीन-चार वर्षांपासून ग्रुप डीची जवळपास 200 पदे रिक्त आहेत, ती त्वरित भरण्यासाठी योग्य प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, तसेच वर्कशॉप मधील शेड हे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात लिकेज होत असल्याने रेल्वेच्या मालकीच्या मशीन पाणी पडून खराब होण्याची भीती असते, सहाय्यक मंडल अभियंता साहेबांकडे वारंवार तक्रार करून देखील ते त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार प्रतिनिधींनी केली.
ज्या कर्मचाऱ्यांचे ऑन रिक्वेस्टचे फॉर्म पेंडिंग पडलेले आहेत ते फॉरवर्ड करावेत, 10 % व 40% मध्ये सिएट झालेल्या कर्मचाऱ्यांना इंजीनियरिंग कारखाना मनमाडसाठी रिलीव्ह करण्यात यावे, यासाठी प्रशासकीय वारवार प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली वर्कशॉप मधील रिकाम्या पडलेल्या जागेचा उपयोग ब्रिज उत्पादनाबरोबर इतर नव्या उत्पादनाची सुरुवात करण्यासाठी करण्यात यावा, अशी सकारात्मक व दृष्टी ठेवून मागणी देखील करण्यात आली. गावाकडील भागात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बंद असलेला फुट ओवर ब्रिज चालू करण्यासाठी प्रशासन स्तरावर प्रयत्न करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.
चेअरमन प्रकाश बोडके व सेक्रेटरी नितीन पवार यांनी विकासकुमार जैन यांचा सत्कार केला. याप्रसंगी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे कारखाना शाखा पदाधिकारी वर्किंग चेअरमन महेंद्र चौथमल, खजिनदार मुक्तार शेख, गौतम वाघ, गिरीष पाटिल, गणेश हाडपे , सुनील शिंदे, शेखर दखने, युवा चेअरमन वैभव कापडे, युवा वर्किंग चेअरमन अरुण कलवर, युवा सचिव सोमनाथ सणस आदी उपस्थित होते.













