दि.3 डिसेंबर पासुन भुजबळ नॉलेज सिटी, नाशिक येथील कुसुमाग्रज नगरी येथे सुरू असणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
काल ग्रंथ दिंडी , विविध सांस्कृतिक कार्यक्रम , कवी संमेलन आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य असा मुख्य सभामंडप बांधण्यात आला असुन , बंधीस्त हॉल मध्ये देखील कार्यक्रमाची व्यवस्था करण्यात आली आहे. संमेलनाच्या ठिकाणी या अनेक पुस्तकांचे स्टॉल , पुस्तक प्रदर्शन , भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे देखावे बघायला मिळत आहे.
संमेलनाच्या ठिकाणी प्रवेश करताना विविध ठिकाणी स्वागत कमान उभारण्यात आलेल्या आसुन त्यांना महापुरुषांची नावे देण्यात आलेली आहे. कुसुमाग्रजनगरीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ध्वजारोहण करून भारतीय संस्कृतीमध्ये शुभ कार्य साजरे करत असताना करण्यात येणारे कलश पुजन करून गुढी उभारण्यात आलेली आहे.संपूर्ण परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करून फुलांची सजावट करण्यात आलेली आहे.


3,4 आणि 5 डिसेंबर रोजी होत असणाऱ्या या संमेलनात नाशिक शहर आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होऊन या साहित्य पर्वणीचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजन समिती तर्फे करण्यात आलेले आहे.













