loader image
[ays_poll id=7]

मनमाडच्या जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी!

Dec 7, 2021

मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे 3 ते 6 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनिअर व सीनिअर वेटलिफ्टींग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंनी ऐतिहासिक यश संपादन केले. महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यातील खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेत दर्जेदार खेळाचे प्रदर्शन केले.

आकांक्षा किशोर व्यवहारे हिने 40 किलो वजनी गटात 125 किलो वजन उचलून आपल्या पहिल्याच राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले व युथ मुलींमध्ये बेस्ट लिफ्टरचा बहुमान पटकावला. दिया किशोर व्यवहारे हिने 45 किलो वजनी गटात 125 वजन उचलून एक सुवर्ण एक रौप्य व एक कांस्य पदक पटकावले. निकिता वाल्मीक काळे हिने 71 किलो वजनी गटात 183 किलो वजन उचलून सुवर्णपदक, धनश्री विनोद बेदाडे हिने 81 किलो वजनी गटात 140 कीलो वजन उचलून सुवर्णपदक, वैष्णवी जनार्दन उगले हिने 64 किलो वजनी गटात 126 किलो वजन उचलून रौप्य पदक, मुकुंद संतोष आहेर याने 55 किलो वजनी गटात 203 किलो वजन उचलून रौप्य पदक, साईराज राजेश परदेशी याने 61 किलो वजनी गटात 190 किलो वजन उचलून रौप्य पदक, अमृता भाऊसाहेब शिंदे हिने 45 किलो वजनी गटात 109 किलो वजन उचलीत कांस्य पदक, खुशाली निवृत्ती गांगुर्डे हिने 49 किलो वजनी गटात 143 किलो वजन उचलून रौप्य पदक, वैष्णवी वाल्मीक ईप्पर हिने 59 किलो वजनी गटात 116 किलो वजन उचलून कांस्यपदक, श्रावणी विजय पुरंदरे जयराज राजेश परदेशी करुणा रमेश गाढे यांनी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.

यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, एन आय एस प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापिका सौ. के एस लांबोळे, उपमुख्याध्यापक आर एन थोरात, पर्यवेक्षक संदीप देशपांडे, जय भवानी अद्ययावत व्यायाम शाळेचे मोहन गायकवाड, डॉ विजय पाटील, मा नगराध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रा दत्ता शिंपी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
.