Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

SCST असोसिएशनच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन !

Dec 7, 2021

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. मनमाड वर्कशॉप मध्ये अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कारखाना शाखा वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, कारखाना शाखा संघटक सचिव सचिन इंगळे, कारखाना शाखा कार्यालय सचिव संदीप पगारे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाडचे सचिव संदीप धिवर, कंन्झुमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी मनमाडचे संचालक मंडळ, सदस्य राकेश ताठे आदी मान्यवर उपस्थित होते.
असोसिएशनचे जेष्ठ कार्यकर्ते संजय अहिरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. चुनीलाल मकवाना यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. झोनल सचिव सतिश केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम करण्यात आला.
सुत्रसंचलन सचिन इंगळे यांनी तर आभारप्रदर्शन कल्याण धिवर यांनी केले. यावेळी सचिन इंगळे,शरद झोंबाड, आदी चे भाषणे झाली.
कार्यक्रमाचे आयोजन फकिरा सोनवणे, सागर साळवे, प्रशांत मोरे, पंढरीनाथ पठारे, किरण वाघ, दिपक अस्वले, दिपक राऊत, संजय केदारे, संतोष सावंत, राजेश जगताप, संजय गायकवाड, अनिल अहिरे, विशाल त्रिभुवन, विकास अहिरे, गणेश केदारे, विनोद झोडपे, सिद्धार्थ निकम आदींनी केले होते.

अजून बातम्या वाचा..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]