loader image
[ays_poll id=7]

आधी अवकाळी, महापुर आणि आता खतांच्या वाढलेल्या दरांमुळे शेतकरी संकटात !

Dec 9, 2021

गेल्या काही महिन्यात अवकाळी पाऊस व महापुर यातुन कुठेतरी सावरत असताना ऐन रब्बी हंगामाची पेरणी तोंडावर असताना आता त्यासाठी लागणाऱ्या खतांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला आता दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे.

ऐन पेरणीची लगबग सुरु असतानाच खतांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मात्र जास्तीचे पैसे देऊन खतं विकत घ्यावी लागत आहेत. जास्तीचे पैसे मोजून खतं विकत घेतल्याशिवाय बळीराजासमोर आता दुसरा पर्यायही शिल्लक राहिलेला दिसत नाही. युरियाचा भाव आणि डीएपी खताचे भाव जरी वाढला नसला तरी रब्बी हंगामामध्ये पेरणी करण्यासाठी लागणाऱ्या खतांच्या किंमती मात्र मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात खताच्या किमती वाढल्या असल्याने याचा थेट परिणाम भारतातील खताच्या किंमतीवर झाल्याचंही काही तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं. कोरोनाच्या काळात केंद्राने रासायनिक खतांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला होता. पण लॉकडाऊनमध्ये शेतीमालाला भाव नसल्याने शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती चांगलीच खालावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर केंद्राने ही किंमत वाढ काही अंशी मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

  ढेकू ( प्रतिनिधी ) ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचालित माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे...

read more
.