Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम सुधारणा करणार

Dec 9, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षस्थानी राज्यातील बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, 1963 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

ज्या बहुउद्देशिय सहकारी संस्था त्यांच्या सदस्यांना पीक कर्ज वितरीत करतात त्यांनाच बाजार समितीवर संचालक निवडून देण्यासाठी मतदानाचा अधिकार देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

बाजार समितीच्या बाजार आवारात नियमनात नसलेल्या शेतमाल व अन्य उत्पादनाच्या खरेदी-विक्रीवर बाजार समितीला उपयोगिता शुल्क घेण्याचा हक्क असेल.

बाजार समितीवर नियुक्त करावयाच्या अशासकीय प्रशासकीय मंडळाची संख्या 7 पेक्षा जास्त सदस्यांची असणार नाही.

बाजार समितीवर देखरेख शुल्क वसुलीसाठी बाजार समितीवर शासनाचा कर्मचारी नियुक्त करण्याची तरतूद वगळण्यात येईल व देखरेख फी “5 पैसे” ऐवजी “10 पैसे” अशी सुधारणा प्रस्तावित आहे.

बाजार समितीवर सचिव नियुक्त करण्यासाठी सध्याची राज्य पणन मंडळाने सचिव म्हणून नियुक्त करावयाच्या व्यक्तींची यादी तयार करण्याबाबतची तरतूद वगळण्यात येईल.
बाजार समितीवर सचिव म्हणून सहकार अधिकारी श्रेणी-2 यापेक्षा वरच्या दर्जाचा अधिकारी शासनाला नेमता येईल.

राज्य कृषि पणन मंडळास त्यांना देय रक्कमाबाबत वाद उद्भवल्यास न्यायाधिकरणाकडे दाद मागता येईल, अशी सुधारणा करण्यात येईल.

अजून बातम्या वाचा..

सार्वजनिक शिवजयंती च्या अध्यक्ष पदी आमदार सुहास आण्णा कांदे तर कार्याध्यक्षपदी मयूर बोरसे यांची निवड

सार्वजनिक शिवजयंती च्या अध्यक्ष पदी आमदार सुहास आण्णा कांदे तर कार्याध्यक्षपदी मयूर बोरसे यांची निवड

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची बैठक काल हिरूभाऊ गवळी मंगल कार्यालय मनमाड येथे संपन्न झाली. सन...

read more
प्रजासत्ताकदिनी प्रभात फेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने जातेगावला विद्यार्थिनीचा मृत्यू

प्रजासत्ताकदिनी प्रभात फेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने जातेगावला विद्यार्थिनीचा मृत्यू

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता माध्यमिक विद्यालयात...

read more
बघा व्हिडिओ – मनमाड ला गणेश जयंतीनिमित्त निलमणी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

बघा व्हिडिओ – मनमाड ला गणेश जयंतीनिमित्त निलमणी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]