Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कवी प्रदीप गुजराथी यांच्या ‘वा..वात्रटिकेचा’ पुस्तकाचे प्रकाशन….

Dec 11, 2021

मनमाड : येथील प्रसिद्ध साहित्यिक व कवी प्रदीप गुजराथी यांच्या वा…! वात्रटिकेचा…!! या विनोदी कविता व वात्रटिकासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच ९४ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध कवी व संमेलनाचे कार्यवाह डाॕ.प्रा. शंकर बो-हाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

कष्टाचे चांदणं करीत जीवनावर भरभरुन प्रेम करणारा हा कवी आहे.विनोदाची पेरणी करत अंतर्मुख करणारे हे पुस्तक असून याचा प्रत्यय आपणास पानोपानी येतो.
म्हणूनच ते वाचनीय झाले आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी शंकर बो-हाडे यांनी केले.यावेळी मंचावर कादवा शिवारचे संपादक व ज्येष्ठ ग्रामीण कवी विजयकुमार मिठे, ग्रंथप्रकाशन समिती प्रमुख व सुभाषित दिवाळी अंकाचे संपादक सुभाष सबनीस व सौ. आशा प्रदीप गुजराथी उपस्थित होत्या.

प्रदीप गुजराथी यांचे हे चौथे पुस्तक असून “आकाश प्रकाशन ” मनमाडने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. यात एकूण ७८ राजकीय, सामाजिक व जीवनावर भाष्य करणाऱ्या खुशखुशीत कविता व वात्रटिका आहेत.

या पुस्तकाची प्रस्तावना मनमाडकर असलेल्या व आता नाशिक येथे असलेल्या प्राचार्या , ज्येष्ठ साहित्यक , समीक्षक आणि संशोधक डाॕ.वेदश्री थिगळे यांनी लिहिलेली आहे. दीपक दंडवतेंचे मोलाचे सहकार्य लाभले.

याप्रसंगी प्रकाशक आकाश गुजराथीसह १०७ ग्रंथ लिहिणारे थोर साहित्यक प्रभाकर बागुल, किरण दशमुखे (सटाणा) , लेखिका सौ. विद्या वावीकर जुन्नरे, अॕडव्होकेट प्रदीप व सौ. जयश्री शिंदे, मिलिंदभाई व सौ. चित्रा गुजराथी ( सिन्नर ), रसिक श्रोते व मान्यवर साहित्यक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन कवी व अक्षरबंध प्रकाशनाचे संपादक महावीर जोंधळे यांनी केले.प्रकाशननापुर्वीच मोठ्या प्रमाणात नोंदणी झाल्यामुळे आपण समाधानी असल्याचे प्रदीप गुजराथी यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रदीप गुजराथी यांनी रक्तदानाच्या क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कार्याबद्दल ग्रंथ प्रकाशन समितीतर्फे विशेष सत्कार करणात आला.मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या श्रोत्यांनी, रसिकांनी टाळ्यांच्या प्रचंड गजरात आपल्या भावना व्यक्त केल्या.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]