मनमाड:- महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड व 50 महाराष्ट्र एनसीसी बटालियन औरंगाबाद यांच्या वतीने हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्युमुखी पावलेल्या भारताचे प्रथम सी.डी.एस. जनरल बिपिन रावत व इतर अधिकारी, जवान यांना महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण विठ्ठल पाटील यांनी संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने वीरमरण आलेल्या जवानांना प्रति शोक संदेश व्यक्त केला.एनसीसी विभागाच्या कॅडेट्सनी गार्ड ऑफ ऑनर अर्पण केला. श्रद्धांजली देण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य डॉ. पी.जी. आंबेकर, कुलसचिव श्री समाधान केदारे,प्राध्यापक वर्ग ,प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड
मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...






