Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड येथे श्री दत्त जयंती सोहळ्यास प्रारंभ….

Dec 13, 2021

मनमाड शहरातील श्री दत्त मंदिर आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे श्री दत्त जयंती सोहळ्याला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून सुरवात झाली.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना परिस्थिती मुळे श्री दत्त जयंती सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता , यंदाच्या वर्षी कोरोना परिस्थिती कमी झाल्याने शासनाच्या नियमानुसार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री दत्त मंदिर येथे दि.12 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन या मध्ये सकाळी 7 ते 8 अभिषेक , महाआरती 8 ते 12 श्री गुरुचरित्र पारायण , 1 ते 2 भजन , 3 ते 5 कीर्तन , 6 ते 7 हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये देखील यंदाच्या वर्षी भव्य स्वरूपात श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येत असुन , श्री स्वामी समर्थ दरबाराचे सेवेकऱ्यांकडुन सुंदर सजावट करण्यात आलेली आहे. दि.12 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत उत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये श्री गुरुचरित्र , श्री नवनाथ पारायण , विणा वादन , स्वामीचरित्र ग्रंथ वाचन , श्री स्वामी समर्थ जपमाळ अखंड प्रहारे , होम-हवन आदी धर्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सात दिवस सुरू असणाऱ्या श्री दत्त जयंती सोहळ्यामध्ये शहरातील जास्ती-जास्त भक्त परिवार आणि नागरिकांना सहभागी व्हावे असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

अजून बातम्या वाचा..

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघदर्डी येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघदर्डी येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

माध्यमिक विद्यालय वागदर्डी येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन डॉ. एपीजे...

read more
नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी...

read more
मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अहिंसा व समतेचे प्रतिक अग्रकुल प्रवर्तक छत्रपति महाराजाधिराज अग्रसेन जी भगवान यांचा...

read more
आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]