Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कऱ्ही येथे क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची जयंती साजरी!

Dec 13, 2021

नांदगाव तालुक्यातील कऱ्ही येथील माध्यमिक विद्यामंदिर येथे क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामध्ये क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. क्रा.वसंतराव नाईक यांचा जन्म नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव येथील श्रीमंत कुटुंबात १३ डिसेंबर १९१२ रोजी झाला. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्यांनी विविध आंदोलनात सहभाग घेतला. सायमन कमीशनला विरोध करीत महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाच्या सत्याग्रहात सहभाग घेतला व तुरंगवास देखील भोगला. भूमीगत राहून त्यांनी इग्रंजांना सळो की पळो करून सोडले. मनमाड नगरपालिकेतील सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणूनही त्यांना बहुमान मिळाला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नाशिकमधून दोनदा आमदार म्हणून निवडून आले. क्रांतिवीर वसंतराव नाईक यांचे देशकार्यातील योगदान अतिशय मोठे आहे. सरकारने आजवर त्यांच्या कार्याची नोंद शासकीय दप्तरात करणे आवश्यक होते. मनमाड तसेच नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी जशी त्यांची स्मृती जपली आहे तसेच शासनाने त्यांच्या कार्याची स्मृती जपली पाहिजे अशी कळकळीची अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

न्याय द्या नाही तर इच्छा मरणाची परवानगी द्या : न्यायडोंगरीच्या कोकाटें ची महसूल आयुक्तांकडे मागणी

न्याय द्या नाही तर इच्छा मरणाची परवानगी द्या : न्यायडोंगरीच्या कोकाटें ची महसूल आयुक्तांकडे मागणी

नांदगाव ( सोमनाथ घोंगाणे ) नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील शेतकरी लक्ष्मण कोकाटे यांनी...

read more
वैशंपायन परिवाराचे सामाजिक योगदान, पितृपक्षात नाविन्यपूर्ण रीतीने केले पूर्वजांचे स्मरण

वैशंपायन परिवाराचे सामाजिक योगदान, पितृपक्षात नाविन्यपूर्ण रीतीने केले पूर्वजांचे स्मरण

(हर्षद गद्रे सर) मनमाड शहरातून भारतीय खाद्य निगम अर्थात एफ सी आय मधील सेवानिवृत्त व्यवस्थापक कै....

read more
राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत अंगणवाडी ताई करत आहे स्थानिक पोषण आहारा विषयी जनजागृती-ज्योती चौधरी अंगणवाडी सेविकाताई..

राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत अंगणवाडी ताई करत आहे स्थानिक पोषण आहारा विषयी जनजागृती-ज्योती चौधरी अंगणवाडी सेविकाताई..

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक - २ .अंगणवाडी क्रमांक ३८. मातोश्री रमाबाई आंबेडकर...

read more
शास्रज्ञ डॉ.ओमप्रकाश गणपतराव कुलकर्णी यांची व्ही.जे.हायस्कुलला भेट : ऑनग्रेड सोलरसिस्टीम चे उद्घाटन

शास्रज्ञ डॉ.ओमप्रकाश गणपतराव कुलकर्णी यांची व्ही.जे.हायस्कुलला भेट : ऑनग्रेड सोलरसिस्टीम चे उद्घाटन

नांदगाव ( सोमनाथ घोंगाणे ) नांदगाव शहरातील व्ही.जेहायस्कुल, येथे जागतिक पहिल्या सौर उष्णतेवर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]