Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा जाहीर निषेध

Dec 18, 2021

कर्नाटक राज्यातील बँगलोर शहरात काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.

महाराष्ट्राचे अराध्य दैवत विश्व वंदनीय जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे आपण सर्वच वारसदार आहोत यात जाती भेद पक्ष पार्टीचा विषय नसून झालेली घटना सर्व शिवप्रेमी साठी अत्यंत क्लेशदायक घटना आहे.
त्यांचा गैरफायदा कोणी घेऊ नये यासाठी दोषी असणाऱ्या समाज कंटकांना त्वरीत अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासन जबाबदार असेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
झालेल्या घटनेचा सकल मराठा समाज, मनमाड व अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक व समस्त शिवप्रेमी यांनी जाहीर निषेध व्यक्त केला व दोषींवर कठोर कारवाई करावी यासाठीचे निवेदन पोलीस निरीक्षक मनमाड यांना दिले.

निवेदनावर परेश राऊत, भास्कर झाल्टे,स्वराज करकाळे, भिमराज लोखंडे, निलेश पाचोरकर, सुहास जाधव,सागर आहेर,ललित रसाळ,अरविंद काळे,बबलु पाटील, प्रमोद आहेर,विठ्ठल नलावडे, कांतीलाल येणारे, पंकज खताळ, नाना घुमरे,सुधीर पाटील, नितीन चौभे,मयूर शेळके, प्रभाकर भोसले,सनी फसाटे,मंगेश दुधभाते,दत्तु शिंदे, भिमराज वाघमारे, अमोल दंडगव्हाळ, दिपक कवडे, आकाश वाघमारे, भुषण दरगुडे,संजय आहेर,निशांत पाटील यांच्या सह्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]