Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सर्वांसाठी घरे संघर्ष समन्वय समितीची आढावा बैठक संपन्न

Dec 18, 2021

शासनाच्या सर्वांसाठी घरे २०२२ योजनेअंतर्गत मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे अवलोकन करून येणाऱ्या काळात सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचे ७/१२ मिळवून देण्यासाठी समितीचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक नाजीमभाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये येणाऱ्या काळात करावयाच्या कामाची रूपरेषा ठरविण्यात आली तसेच या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना योजनेसंबंधी जनजागृती अभियान सुरु केले जाणार आहे.
शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी एक सर्वांसाठी घरे २०२२ हि योजना असून याद्वारे पात्र अतिक्रमणधारकांना त्यांचे हक्काचे ७/१२ उतारे मिळणार असून मागील दिड वर्षांपासून नगरसेवक नाजीमभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली सर्वांसाठी घरे संघर्ष समन्वय समिती स्थापन करण्यात आली. समितीतर्फे सर्वांसाठी घरे २०२२ या योजनेची मनमाड शहरात तात्काळ अंमलबजावणी करणेसाठी शासन दरबारी पाठपुरावा मागील दिड वर्षांपासून सातत्याने सुरु असून मनमाड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नाजीमभाई यांनी हि योजना लवकरात लवकर मार्गी लावून पात्र अतिक्रमणधारकांना हक्काचे ७/१२ देण्याची ठाम भूमिका मांडली. समितीतर्फे भूमी अभिलेख कार्यालय नांदगाव -मनमाड नगरपरिषद -प्रांत कार्यालय येवला यांच्या कामात सुसूत्रता घडवून आणली व या योजनेच्या कार्याला खऱ्या अर्थाने गती प्राप्त झाली.
पात्र अतिक्रमणधारकांच्या जागेची मोजणी करणे अत्यावश्यक असतांना पात्र अतिक्रमणधारक हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने पुढील कार्य मार्गी लागणेसाठी महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री मा. ना. श्री. बाळासाहेब थोरात यांना भेटीसाठी नगरसेवक नाजीमभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ जाऊन पात्र अतिक्रमणधारकांची बाजू मांडण्यात आली यावर मंत्रिमहोदयांनी मोजणी फी कामी योग्य त्या सूचना करण्याचे आश्वासन दिले. आढावा बैठकीस समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक नाजीमभाई शेख, भीमराज लोखंडे, कयाम सैय्यद,फिरोजभाई शेख, कदीर शेख, जाहिद शेख, अफरोज अत्तार, सद्दाम अत्तार व इतर पदाधिकारी उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]