Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नगर पंचायत निवडणूक : मविआच्या ३ मंत्र्यांनी ठोकला तळ!

Dec 19, 2021

२१ डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी मविआच्या 3 मंत्र्यांनी जिल्ह्यात तळ ठोकला आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जिल्ह्यात प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. ओबीसी राखीव असणाऱ्या 11 जागांसाठी आता खुल्या प्रवर्गातून निवडणूक होत असुन या जागांवर १८ जानेवारीला मतदान व संपूर्ण मतमोजणी 19 जानेवारी रोजी होणार आहे.

जिल्ह्यातील नगरपंचायतींची निवडणूक अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी तीन मंत्री रिंगणात उतरले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात सुरगाणा येथे तळ ठोकून आहेत. कृषिमंत्री दादा भुसे हे पुढील तीन दिवस सुरगाणा, पेठ आणि कळवण तालुका पिंजून काढणार आहेत. या भागात त्यांच्या रॅली आणि सभा होणार आहेत. सोबतच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळही जिल्ह्यात तळ ठोकून आहेत.

अजून बातम्या वाचा..

कर्डकांनी आपल्या साहित्य साहिरीतून संविधानिक विचार मूल्य लोकमाणसात रुजवले : डॉ.उत्तम अंभोरे

येवला (प्रतिनिधी) : माणसाच्या विचार प्रक्रियेत होणाऱ्या बदलाचा परिवर्तनाचा विचार संविधानात केला...

read more
रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी कवच-कुंडल मोहिम राबवावी : पालकमंत्री छगन भुजबळ

रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी कवच-कुंडल मोहिम राबवावी : पालकमंत्री छगन भुजबळ

तालुक्यांतील वाढती रूग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी मोहीम स्तरावर जनजागृतीसह...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]