loader image
[ays_poll id=7]

स्पर्धा परीक्षा क्लासेस संचालकांची उद्या बैठक

Dec 24, 2021

राज्यातील पेपरफुटी प्रकरणात औरंगाबाद येथील काही स्पर्धा परीक्षा क्लासेस संचालकांना अटक करण्यात आली. वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांशी असलेल्या संबंधांमुळे, गेल्या अनेक वर्षांपासून अशाप्रकारे तक्रारी व बातम्या येत आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी, शासनाने काल विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, लवकरच या प्रकारच्या क्लासेसवर निर्बंध आणून कडक कायदा आणण्यात येईल. पण काही मुठभर संचालकांच्या चुकीची शिक्षा सर्वसामान्य व प्रामाणिकपणे क्लासेसचालकांना का व्हावी, असा सवाल करत, सरकारला कायदा करताना विश्वासात घेण्याविषयी निवेदन देणे व याविषयी अधिक निर्णय घेण्यासाठी, उद्या रविवारी २६ ला, सकाळी ११ वाजता, शिंगाडा तलाव येथील, नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या कार्यालयात याबाबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केल्याची माहिती, संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी दिली. शहर व जिल्ह्यातील सर्व स्पर्धा परीक्षा क्लासेस संचालकांनी जबाबदारीने या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे या विभागाचे प्रमुख सागर सानप, लखन अग्रवाल, जितेंद्र गवळी, अमृतकर यांच्यावतीने, संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
.